आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेषसामाजिक

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जुहू बिचवर “आंतरराष्ट्रीय योग दिन”*

- शिवसेना खासदार रविंद्र वायकर तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य योगोत्सवाचे आयोजन

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जुहू बिचवर “आंतरराष्ट्रीय योग दिन”*

 

– शिवसेना खासदार रविंद्र वायकर तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य योगोत्सवाचे आयोजन

– २१ जून २०२६ रोजी सकाळी ६ ते ८ कालावधी

– शिबिरात १ हजार नागरिक सहभागी होणार

– या शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांसाठी प्रवेश विनामुल्य

– विविध क्षेत्रातील मान्यवर राहणार उपस्थितीत

 

*मुंबई:*

 

भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेला आणि जागतिक पातळीवर सन्मान मिळवलेला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ दरवर्षीप्रमाणे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार रविंद्र वायकर तसेच मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार अमित साटम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जुहू बीच येथे २१ जुन २०२६ रोजी सकाळी ६ ते ८ या कालावधीत एका भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपस्थीत राहणार आहेत.

 

वाढत्या ताणतणावाच्या युगात नागरिकांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगता यावे, तसेच योगासनाचा संदेश घराघरांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ‘पूर्णस्य योग’ संस्थेचे विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे) धडे देतील. या शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांना जुहू बीचची विस्तीर्ण चौपाटी, जिथे पहाटेच्या प्रसन्न आणि शुद्ध हवेत शेकडो नागरिक एकत्र येऊन योगसाधना करण्याची सुवर्ण संधी आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त प्राप्त होणार आहे.

‘पूर्णस्य योग’ तसेच अन्य दोन योग संस्थांच्या संयुक्त या शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला असून सहभागी नागरिकांना योगा मतहि देण्यात येणार आहेत. सर्व वयोगटातील नागरिकांना सहज करता येतील अशा सोप्या योगपद्धती आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व यावर या शिबिरात प्रकाश टाकला जाणार आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी २१ जून रोजी पहाटे जुहू बीचवर उपस्थित राहून या सामूहिक योगसाधनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आणि योग संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button