“जागृत महाराष्ट्र पुरस्कार सोहळा २०२६” यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न
संपादक अमोल भालेराव यांनी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर शिक्षण महर्षी अजय कौल सर यांचे मानले विशेष आभार


मुंबई : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी जागृत महाराष्ट्र तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा राज्यस्तरीय “जागृत महाराष्ट्र पुरस्कार सोहळा २०२६” यंदाही मोठ्या उत्साहात ७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता यारी रोड, अंधेरी पश्चिम येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या भव्य कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर शिक्षण महर्षी अजय कौल सर, फायटर मास्टर शैला टीके-कुलकर्णी, शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर,माजी मंत्री तथा आमदार असलम शेख, आमदार ,माजी मंत्री संजय बनसोडे ,आमदार हरून खान, महिला विभाग संघटिका अनिता बागवे,दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम,मुंबई काँग्रेसचे महासचिव व उत्तर भारतीय प्रकोष्ठाचे अध्यक्ष अवनीश तीर्थराज सिंह, समाजसेवक ,संघटक संजय सुतार, उद्योजक दिपक शेठ शंकर भंडारी विकासक, माजी नगरसेविका संगीता सुतार,नगर सेविका संगीता कोळी,माजी नगरसेविका ज्योत्स्ना दिघे, उपविभाग प्रमुख प्रसाद आयरे,शाखा प्रमुख सतीश परब,उपविभाग प्रमुख अंकित सुतार,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी दीपाली सय्यद,आमदार असलम शेख,आमदार हरून खान,संजय मानाजी कदम यांनी देशात होणाऱ्या महागाई,महाग शिक्षण,भ्रष्टाचार वर आवाज उठवणाऱ्या प्रसार माध्यम संस्था,पत्रकार यांचा प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.जागृत महाराष्ट्र पुरस्कार सोहळ्याचे कौतुक करत संपादक अमोल शोभा गौतम भालेराव यांनी तळागाळातील संस्थेचा सत्कार केल्याचे सांगितले.

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला…
१. **नरसिंग जनार्धन सोनटक्के** – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
२. **सुनीता अशोक कावळे (संस्थापिका, अन्नपूर्णा ब्रँड)** – जागृत आदर्श उद्योजिका
३. **सचिन अर्जुन कदम (संकल्प प्रतिष्ठान)** – जागृत आदर्श सामाजिक संस्था
४. **रामेश्वर शिवाजी दरेकर (संपादक, दैनिक बुलंद शक्ती)** – जागृत निर्भीड आदर्श पत्रकार
५. **अक्षय मराठे (संस्थापक, शिव चैतन्य अकॅडमी)** – जागृत आदर्श संस्थापक
६. **पुरुषोत्तम अग्रवाल (अध्यक्ष, समता फाउंडेशन)** – जागृत आदर्श सामाजिक संस्था
७. **शुभांगी किरण राऊत (सचिव, मानवता विकास संस्था)** – जागृत आदर्श सामाजिक संस्था
८. **शीतल विक्रांत भाटकर (विथ आर्या)** – जागृत आदर्श सामाजिक संस्था
९. **सचिन रामचंद्र येरमे** – जागृत आदर्श शेतकरी पुरस्कार
१०. **डॉ. तानाजी चंदावार** – जागृत आदर्श डॉक्टर
११. **नामदेव विठ्ठल झिंगाडे (अध्यक्ष, प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट)** – जागृत आदर्श संस्थापक
१२. **सुषमा हौसा रामचंद्र जाधव** – जागृत आदर्श पत्रकार
१३. **रेड बॉईज फॉउंडेशन** – जागृत आदर्श सामाजिक संस्था
१४. **प्रथमेश भुपेश पाटील (संस्थापक, डीवाईन ट्रस्ट फॉउंडेशन)** – जागृत आदर्श सामाजिक संस्था
१५. **डॉ. अनिल साहेबराव बिऱ्हाडे** – जागृत आदर्श रुग्ण मित्र
16. श्री नथुराम प्रभाकर सूर्यवंशी जागृत नागरिक पुरस्कार 2026

समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हा या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे जागृत महाराष्ट्रचे संपादक/संचालक अमोल शोभा गौतम भालेराव आणि सूरज भालेराव, यांनी सांगितले की, “समाजातील सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. समाजासाठी झटणाऱ्या अशा व्यक्तींचा सन्मान हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”…



