मुंबई महापालिकेच्या के पश्चिम विभाग प्रभाग समिती अध्यक्षपदी वॉर्ड क्रमांक 68 चे रोहन राठोड; पुन्हा एकदा ताकद सिद्ध
२०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर यांचा दोन हजार तर २०२६ च्या निवडणुकीत मनसेचे संदेश देसाई यांचा ६६२४ मतांनी केला होता पराभव

मुंबई महापालिकेच्या के पश्चिम विभाग प्रभाग समिती अध्यक्षपदी वॉर्ड क्रमांक 68 चे रोहन राठोड; पुन्हा एकदा ताकद सिद्ध

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या पश्चिम विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षपदी रोहन राठोड यांची निवड निश्चित मानली जात असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
२०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रोहन राठोड यांनी तब्बल २ हजारांहून अधिक मतांनी माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर यांचा पराभव करत दमदार विजय मिळवला होता. त्या विजयामुळे पश्चिम विभागातील त्यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाले होते.

नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही रोहन राठोड यांनी आपली राजकीय ताकद कायम ठेवली. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांचा तब्बल ६६२४ मतांनी पराभव करत त्यांनी प्रभावी कामगिरी नोंदवली. या विजयामुळे पश्चिम विभागात त्यांची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
के पश्चिम विभाग प्रभाग समिती अध्यक्ष साठी नामांकन अर्ज दाखल करताना सोबत विट्ठल बंदेरीं, अनिश मकवानी, दीपक कोतेकर, सुधा सिंह, सुनिता राजेश मेहता, सायली कुलकर्णी, रूपेश सावरकर हे सर्व भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते
स्थानिक पातळीवर विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि संघटनात्मक बांधणी या माध्यमातून रोहन राठोड यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे पश्चिम विभागातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



