आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेषशैक्षणिकसामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शेखर मुंदडा वर पुन्हा विश्वास; गोसंवर्धनाला नव्या पर्वाची सुरुवात

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची पुनर्नियुक्ती; 'गो-10 व्हिजन'चा निर्धार

 

मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा पुनर्नियुक्ती झाल्यानंतर अध्यक्षांनी आपल्या नव्या कार्यकाळाची अधिकृत सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करत ४ ऑगस्ट २०२६ रोजी अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली. यापूर्वी त्यांचा कार्यकाळ ६ जुलै २०२६ रोजी पूर्ण झाला होता.

पुनर्नियुक्तीनंतर मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत राज्यातील गोसंवर्धनाच्या कामाला अधिक गती देण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

दरम्यान, राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकृत नियुक्ती अधिसूचनेची प्रत देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्रातील गोसंवर्धन, गोशाळांचे सक्षमीकरण आणि गो-आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी त्यांनी सांगितले की, पुढील तीन वर्षांत ‘गो-10 व्हिजन’ अंतर्गत महाराष्ट्र गोसेवा आयोगाला देशातील सर्वोत्कृष्ट आणि आदर्श आयोग म्हणून विकसित करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी काम केले जाईल. देशी गोवंशाचे संरक्षण, संवर्धन, संगोपन, गोशाळांचे बळकटीकरण आणि गो-आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करत, ही पुनर्नियुक्ती केवळ पदाचा सन्मान नसून महाराष्ट्रातील गोसेवा चळवळीला अधिक उंचीवर नेण्याची मोठी जबाबदारी असल्याची भावना व्यक्त केली.

Slug: maharashtra-goseva-aayog-chairman-reappointment-go10-vision

 

Tags: महाराष्ट्र गोसेवा आयोग, गोसंवर्धन, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, शेखर मुंदडा,गोशाळा, गो-10 व्हिजन, महाराष्ट्र सरकार, मंत्रालय, ग्रामीण अर्थव्यवस्था

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button