आपली मुंबईमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष पत्रकारांचा बुलंद आवाज सन्माननीय यशवंत पवार यांना संघर्ष योद्धा पुरस्कार जाहीर

पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष पत्रकारांचा बुलंद आवाज सन्माननीय यशवंत पवार यांना त्यांच्या केलेल्या व करत असलेल्या कामाची दखल घेत लोकप्रधान न्यूज नेटवर्क यांच्या वतीने २०२१ चा

मानाचा राज्यस्तरीय पत्रकार संघर्ष योद्धा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे , प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर नेहमीच आंदोलने , निदर्शने, निवेदने , तसेच मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार द्वारे पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडून पत्रकारांच्या उन्नतीसाठी , भल्यासाठी ,कल्याणासाठी , वारंवार संघर्षाची भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केले असून त्यांनी

पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून प्रभावी संरक्षण कायदा , पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना देऊन , पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना शासनदरबारी घरकुल मिळणेबाबत ,  धमकी मारहाण , यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती , कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत , राज्यातील यूट्यूब / पोर्टल या माध्यमांना शासकीय जाहिराती व शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची नोंदणी यासह राज्यातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आक्रमकपणे शासन दरबारी लढाई करत असल्याने यशवंत पवार यांच्या या कार्याची लोकप्रिय लोकप्रधान न्यूज चॅनेल ने दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समिती चे अध्यक्ष यशवंत पवार यांना २०२१ चा पत्रकार संघर्ष योद्धा पुरस्कार जाहीर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button