दापोलीमहाराष्ट्रमुंबईरत्नागिरी

खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनच्या वतीने किशोर किशोरी संघांना जिल्हास्तरसाठी कब्बड्डी पोशाख वाटप व शुभेच्छा कार्यक्रम संपन्न……

पोषाखासाठी खेड नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष श्री.कुंदनजी सातपुते व खेड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुप्रियाताई पवार यांचे लाभले मोलाचे योगदान

खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनच्या वतीने किशोर किशोरी संघांना जिल्हास्तरसाठी कब्बड्डी पोशाख वाटप व शुभेच्छा कार्यक्रम संपन्न……

सूरज मोरे रत्नागिरी जिल्हा (ब्युरो प्रमूख)-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित कुंभार्ली चिपळूण येथे संपन्न होणाऱ्या ३६ वी किशोर किशोरि जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी खेड तालुक्यातून किशोर किशोरी संघाची निवड करण्यात आली. किशोरी संघात श्रावणी संजय जाधव- कर्णधार ,सिद्धी अनंत मोरे , साक्षी गणेश माळकर, सृष्टी समीर म्हशीलकर ,अश्विनी सचिन दिवेकर, रिया सुनील पाटणे, श्वेता राजेंद्र जोगळे, पूर्वा अमोल दळवी, समीक्षा शाम जाधव, प्राची नागेश जाधव यांची निवड करण्यात आली तर किशोर संघात सुरज सुरेश पाटील-कर्णधार, परेश राजाराम राणीम, सुजल संजय घाडगे, अभिजीत दिनकर सावंत, स्वराज विनोद तोडकर, पराग नरेश चोगले, जानू रामचंद्र वरक, गंधर्व विनोद साळुंखे, अनिकेत मनोहर बाईत, प्रथमेश दगडू आखाडे, मनीष कमलेश चौगुले यांची त्यांच्या उत्कृष्ट खेळकौशलयानुरूप जिल्ह्यासंघासाठी निवड करण्यात आली.


या निवड झालेल्या संघाला कब्बड्डी पोषाखाचे वाटप करण्यात आले. या पोषाखासाठी खेड नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष श्री.कुंदनजी सातपुते व खेड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुप्रियाताई पवार यांचे मोलाचे योगदान लाभले. खेड तालुक्याचे जिल्ह्यास्तरीय स्पर्धेत नावलौकिक वाढवून आपली निवड जिल्ह्यातून राज्यस्तरावर व्हावी असा बहारदार खेळ करा अशा मौलिक शुभेच्छा खेड कब्बड्डी असो.अध्यक्ष श्री.सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे यांनी दिल्या.तसेच कब्बड्डी पोषाखासाठी सहकार्य करणारे श्री.कुंदनजी सातपुते व सौ.सुप्रियाताई पवार यांना असोसिएशनच्या वतीने आभार मानून धन्यवाद दिले.

यासाठी खेड तालुका कबड्डी असोशियनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष श्री.सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, सचिव श्री.रविंद्र बैकर, कार्याध्यक्ष श्री संमद बुरोंडकर, कोषाध्यक्ष श्री दाजी राजगुरू,उपाध्यक्ष श्री.महेश भोसले, श्री.आनंद हंबीर,सहसचिव श्री.शरद भोसले, ज्येष्ठ सल्लागार श्री.दादा बैकर, श्री.दिलीप कारेकर, कार्यकारणी सदस्य श्री.सु.रा.पवार, श्री.सुभाष आंबेडे, श्री.अमोल दळवी, श्री. मंगेश खेडेकर, श्री.दीपक यादव*यांचे सहकार्य लाभले. मान्यवरांसह श्री.सुजित फागे सर व अन्य कब्बड्डी प्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button