आपली मुंबईमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र राज्यात यिन मंत्रिमंडळ स्थापना झाले

पुणे | महाराष्ट्र राज्यात यिन मंत्रिमंडळ स्थापना झाले .
सकाळ माध्यम समूहाच्या ‘ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या ( यिन ) मुख्यमंत्रिपदी कोल्हापूरचा पार्थ देसाई , तर उपमुख्यमंत्रिपद बारामती येथील अल्लाउद्दीन बेग हे निवडून आले आहेत . यिन ‘ मंत्रिमंडळात सभापतिपदी चंद्रपूरची गायत्री उरकुडे ( चंद्रपूर ) आणि विरोधी पक्षनेतेपदी मुंबईतील समृद्धी ठाकरे यांची निवड झाली आहे. यात राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यामधून लेखी परीक्षा , मुलाखत आणि वक्तृत्व कौशल्य या कसोट्यांवर आधारित निवड प्रक्रियेमध्ये एकेक टप्पा पार करत पहिल्या फेरीत सर्वोत्कृष्ट आठ , दुसऱ्या फेरीत सर्वोत्कृष्ट चार उमेदवार निवडले गेले . आणि त्यांच्या अंतिम मुलाखतीतून मुख्यमंत्रिपदाचे दोन दावेदार आणि त्यांना झालेल्या मतदानाद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवड झाली . या वेळी ‘ यिन’चे सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष या निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते . सर्व उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले यावेळी ‘ सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार जी , यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यम व प्रकाशन केंद्राचे अधिकारी डॉ . बबन जोगदंड सर ,’ यिन’चे संपादक संदीपजी काळे आणि निवड प्रक्रियेसाठी परीक्षक म्हणून मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते भिमेश मुतुला व नांदेड येथील प्राध्यापक गजानन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यिन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला .

YIN_INDIA #PowerOfYouth #Talentofmaha #YIN_Ministry #Shadow_Cabinet

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button