क्रीडामहाराष्ट्ररत्नागिरी

*साईराम क्रीडा मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न*

*साईराम क्रीडा मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न*
             साईराम मित्र मंडळ खेड आयोजित खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नुकतीच नगर परिषद खेड येथील मैदानावर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री. वैभवजी खेडेकर नगराध्यक्ष खेड नगरपरिषद यांचे सह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.


         या स्पर्धेत भैरवनाथ क्रीडा मंडळ चिंचघर यांनी प्रथम क्रमांक तर काळकाई कला, क्रीडा केंद्र भरणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला ५५५५/-₹ व उपविजेत्या संघांला ३३३३/-₹ व आकर्षक ढाल  देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भैरवनाथ क्रीडा मंडळाचा साहिल दळवी  तर रत्नाकर पवार यास उत्कृष्ट पकड म्हणून तसेच काळकाई कला क्रीडा केंद्र भरणेच्या शुभम बिर्जे यास उत्कृष्ट चढाई पट्टू म्हणून आकर्षक ढाल देऊन गौरवण्यात आले. 

शुभम बिर्जे यास उत्कृष्ट चढाई पट्टू म्हणून आकर्षक ढाल देऊन गौरवण्यात आले. 


     या स्पर्धेला पंच प्रमुख श्री.संतोष शिर्के यांचेसह श्री.मधुकर शिंदे, श्री.उल्हास शेलार, श्री. पुरुषोत्तम पाटील, श्री.गणेश सानप, श्री.दिनेश पदुमले, श्री.परेश खोपडे, श्री.शशिकांत भुवड, श्री.अजय निगडेकर यांनी काम पाहिले.       या स्पर्धेदरम्यान खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, सचिव श्री.रवींद्र बैकर, कार्याध्यक्ष श्री.संमदभाई बुरोंडकर, उपाध्यक्ष श्री.महेशराव भोसले, कोषाध्यक्ष श्री.दाजी राजगुरू, सहचिटणीस श्री.शरद भोसले, कार्यकारिणी सदस्य श्री.दीपक यादव, ज्येष्ठ सल्लागार श्री.दिलीप कारेकर, स्वप्निल सैतवडेकर, संपदा गुजराथी, तुषार सापटे यांचेसह अन्य असोसिशन पदाधिकारी उपस्थित होते.


     हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईराम क्रीडा मंडळाचे श्री.संदेश खेडेकर व श्री.सनी देवळेकर यांनी विशेष मेहनत घेतली. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही स्पर्धा कब्बड्डीच्या जोशपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली.

https://www.facebook.com/MaharashtraNews9*

Maharashtra News 9  फेसबूक पेज लाईक करा फॉलो करा आणि बातमी आवडली तर नक्की शेअर करा

https://www.facebook.com/groups/567287290622519/?ref=share


Maharashtra News 9 ( महाराष्ट्र न्यूज 9)   फेसबूक ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा..


https://www.youtube.com/c/MaharashtraNews9 आमची यूट्यूब वृत्तवाहिनी सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button