क्रीडाखेडमहाराष्ट्ररत्नागिरी

आमदार योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहर शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित मॅटवरील भव्य कब्बड्डी स्पर्धा संपन्न

दापोली खेड मंडणगड मतदार संघाचे लोकप्रिय विद्यमान आमदार योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहर शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित मॅटवरील भव्य कब्बड्डी स्पर्धा भगव्यामय वातावरणात पार पडली.


रत्नागिरी जिल्हा कब्बड्डी असोसिऐशन व खेड तालुका कब्बड्डी असोसिऐशन यांच्या मान्यतेने खेड शहर शिवसेना यांच्या वतीने दापोली खेड मंडणगड मतदार संघाचे लोकप्रिय विद्यमान आमदार माननीय श्री. योगेश दादा रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त १८, १९ व २० फेब्रुवारी २०२२ रोजी भव्य जिल्हास्तरीय मॅटवरील निमंत्रित कब्बड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.


या भव्य दिव्य स्पर्धेला शुभेच्या देत शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री माननीय श्री. रामदासभाई कदम यांनी विजयी संघांचे व खेळाडू तसेच क्रीडारसिकांचे अभीनंदन केले.
या स्पर्धेमध्ये रत्नागिरी मधील कब्बड्डीचे माहेरघर असलेल्या दसपटी विभागातील दोन बलाढ्य संघांमध्ये अंतिम लढत झाली असता दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकासह रोख रुपये ५५००० व आकर्षक चषक तसेच वाघजाई कोळकेवाडी क्रीडा मंडळ चिपळूण या संघाने द्वितीय क्रमांकासह रोख रुपये ३३००० व आकर्षक चषक आपल्या नावावर केला. त्याचप्रमाणे तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे न्यू हिंद विजय चिपळूण व गजानन संघर्ष केळशी दापोली यांना रोख रुपये ११००० व आकर्षक चषक देवून त्यांचा गौरव करण्यात आला.


स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण या संघातील अभिषेक भोजने, उत्कृष्ट चढाई साठी वाघजाई कोळकेवाडी क्रीडा मंडळ संघातील ओंकार कुंभार व उत्कृष्ट पकड साठी दसपटी क्रीडा मंडळ चिपळूण संघातून प्रीतेश पालकर यांची निवड करण्यात आली व त्यांना रोख रक्कम तसेच आकर्षक चषक देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.


त्याच बरोबर महिलांना कबड्डीसाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतून महिलांचा प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये दुर्गामाता कोल्थरे या संघांने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तर अनिकेत भरणे या संघाला द्वितीय स्थानावर समाधान मानव लागलं.


या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सभारंभाला आमदार श्री.योगेशदादा रामदासभाई कदम, जिल्हा परिषद सदस्य श्री.अरुण कदम, पंचायत समिती सभापती सौ. मानसी जगदाळे, माजी नगराध्यक्ष श्री. विजय उर्फ बाबू चिखले, माजी नगराध्यक्ष श्री. नागेश तोडकरी, माजी शहरप्रमुख श्री. संजय मोदी, माजी नगराध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, राजेश बुटाला, मिनार चिखले, मिलिंद इवलेकर, कुंदन सातपुते, तुषार सापटे, स्वप्नील सैतवडेकर, बुवा शिंदे, महेश भोसले, अमोल दळवी, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. माधवी बुटाला, शहर युवती प्रमुख पूनम जाधव, नगरसेविका सीमा वंडकर, संपदा गुजराथी, मीनाक्षी मोकाशी व शहरातील तसेच तालुक्यातील पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण स्पर्धेचे समालोचन महाराष्ट्रामधील सर्वोत्तम मराठी समालोचक, कब्बड्डीचे ज्ञानभंडार श्री. अमोलजी टाकले सर यांनी केले.


हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेड शहर शिवसेना शहरप्रमुख श्री. निकेतन पाटणे व रत्नागिरी जिल्हा कब्बड्डी असोसिऐशन चे उपाध्यक्ष तथा खेड तालुका कब्बड्डी असोसिऐशन चे अध्यक्ष माजी नगरसेवक श्री.सतीश उर्फ पप्पू शेट चिकणे यांनी प्रचंड मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button