आपली मुंबईगुन्हेमहाराष्ट्रमुंबईविशेष

सत्यमेव जयते सत्याचा विजय आणि भ्रष्ट आणि आरेचे लुटारू नथु राठोड आणि मयूर गोसावीचा पराजय..

मयूर गोसावीच्या पापाचा घडा भरला..

मयूर गोसावीच्या पापाचा घडा भरला..

शासनाची फसवणूक करणाऱ्या मयुर गोसावीला न्यायालयाचा दणका ?

मुख्य कार्यकारी अधिकारी आरे रवींद्र पवार यांच्या प्रयत्नांना यश!

मयुर गोसावीला २ कोटी २४ लाख रूपये थकबाकी भरण्याचे आदेश…

मुंबई-आरे दुग्ध वसाहतीत नथू राठोड हे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना विविध पोलीस ठाण्यात ६ गंभीर गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या व सध्या भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी दाऊद शेख हल्ल्याप्रकरणी तसेच आरेतील धान्य घोटाळ्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळवून उजळ माथ्याने बाहेर फिरणाऱ्या गुंड प्रवृत्तिच्या निर्ढावलेल्या ठग मयुर विजय गासावी याने राठोड यांच्याशी संगनम करून २०१८ साली शासकीय नियम धब्यावर बसवत आरे दुग्ध वसाहतीतील युनिट नं.२ या ठिकाणी २ गोदामे आणि युनिट नं .५ येथील ४ गाळे बेकायदा ताब्यात घेऊन शासनाच्या परवानगीविना तोडफोड करून त्यांच्या मूळ ढांच्यात बदल केला आणि बदल केलेले हे गाळे व गोदामे शासनाला नकळत परस्पर दामदुप्पट भाडयाने बाहेरील व्यक्तीस देऊन मागील ४ वर्षापासून लाखो रूपये कमवित होता मात्र तो शासनाला एक पैसाही भाडे भरत नव्हता.

मागील चार ते पाच वर्षापासून आरे दुग्ध वसाहतीत अधिकाऱ्याना हाताशी धरून भ्रष्टाचाराचा धुमाकुळ घालणाऱ्या या लफंग्या मयुर गोसावीच्या मुसक्या आवळून मुख्य कार्यकारी अीधकारी रविंद्र पवार यांनी त्याचा आरेतील खेळ संपविला आहे.त्यामुळे त्यांचे चारी बाजूने कौतुक होत आहे.

आरे कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी माननीय दिंडोशी न्यायालयाने मयूर गोसावी याला शासकीय थकबाकी २ करोड २४ लाख रुपये ८ आठवड्याच्या आत भरण्याचे आदेश दिले आहेत.तसेच त्याने सध्या सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याबाबत व त्याच्या बेकायदा ताब्यातील शासनाने ताब्यात घेतलेले गाळे व गोदाम परत मिळविण्यासाठी दाखल केलेल्या याचिका देखील अमान्य करण्यात आल्या आहेत.तसेच या प्रकरणी मा.न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे देखील ओढले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात सहायक सरकारी वकील, श्रीमती शांती कदम यांनी माननीय न्यायालयात शासनाची बाजू ठामपणे मांडून हा गंभीर विषय पुरावे व वस्तुस्थिती दाखवून मा.न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

हे वाटते तेवढे सोप्य प्रकरण नसून घोटाळा १०० करोडच्या घरातला आहे.याबाबत आम्ही दिनांक ९ फेब्रुवारी रोजी राज्यपाल महोदयांशी भेट घेवून पत्रव्यवहार केलेला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.हे प्रकरण बाहेर काढल्यामुळे कदाचित भविष्यात मयूर गोसावी व त्याचे गुंड साथीदार आमची हत्या देखील करु शकतात.महसूल चोर,धान्य चोर मयूर विजय गोसावी याने ही प्रकरणे वर्तमानपत्रात प्रसिध्द करून वाचा फोडणाऱ्याच्या घरी गुंड पाठवून हल्ला करणे,जीवे मारण्याची धमकी देणे,त्यांच्या खोटया तक्रारी करणे तसेच या महसूल चोराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून दहशत निर्माण करणे,असे प्रकार देखील पुर्वी करून पाहिले.या बेकायदा प्रकरणाबाबत नोटीसा द्यायला जाणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांना धमकी देत त्याच्या राठोड यांच्याकडे खोटया तक्रारी करून त्यांच्या बदल्या करायला लावल्या.या गोदाम व गाळयाच्या भाडयामधून मिळणाऱ्या पैशाताून त्याने आरे पोलीस ठाण्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून संपादक/पत्रकार व सामाजिक कार्यकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा देखील प्रयत्न केला आहे.-निलेश हरिश्‍चंद्र धुरी (या घोटाळ्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे)

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पवार यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे त्यांनी शासकीय महसूल मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्या प्रमाणेच आरे वासियांना मूलभूत सुविधा व वीज मीटर देण्यासाठी देखील शासनाशी व खात्याशी प्रस्ताव पाठवून गरीब झोपडीधारकांना आदिवासी बांधवांना मदत करावी-भीमसेन तलवारे (भारतीय जनता पार्टी)

याबाबत सरकारी वकिलांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच वरिष्ठांनी देखील योग्य मार्गदर्शन केले त्यामुळेच हे शक्य झाले अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय महसूल धकवू करू नये.भविष्यात महसूल वाढीसाठी प्रयत्न करणार असून अनधिकृत गोष्टींवर अंकुश लावण्याचा प्रयत्न राहील.-रवींद्र पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button