दापोलीमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय बातमीशैक्षणिक

दापोली येथे रामराजे चे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न

दापोली येथे रामराजे चे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न

येथील रामराजे माहिती तंत्रज्ञान,माध्यमे व हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीर महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 2 ते 8 मार्च 2022 या कालावधीत पार पडले. डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. स्मिताली राजपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप राजपुरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक निर्बाण यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन व समापन झाले. त्यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.जालिंदर पाटील, कु. संयोनी मांढरे, प्रा. कुणाल मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.वेदिका राणे, रामराजे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री .शेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या कालावधीत स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानांतर्गत महाविद्यालय इमारतीच्या बाहेरील व आतील भागाची स्वच्छता केली. याशिवाय स्वयंसेवकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याअंतर्गत प्रा.कुणाल मंडलिक यांनी प्रभावी संभाषण कौशल्य, दापोलीतील ज्येष्ठ कवी सुदेश मालवणकर यांनी माणूस,समाज व समाजसेवा, प्रा.माधव गवाणकर यांनी दोस्ती, मस्ती व धास्ती, वनौशी येथील समाजसेविका सौ.मृदुला निंबकर यांनी स्त्रियांची छेडछाड आणि क्षमता विकास ,तर मुंबईच्या अष्टविनायक डेव्हलपर्सचे संचालक अशोक बहिरवानी यांनी ध्येयनिश्चिती व प्राप्ती या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच स्वयंसेवकांनी विविध मनोरंजन कार्यक्रम सादर केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक शिबिरात सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.जालिंदर पाटील व कु. संयोनी मांढरे तसेच  महाविद्यालयातील प्रा. कुणाल मंडलिक, प्रा. भावेश माळी, श्री. राजेश राऊत, आणि विद्यार्थी परिषदेतील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रतिनिधी योनाथन शिंदे व सोनल खळे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button