आमची मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

शिवसेना दिंडोशी विधानसभा शाखा क्र. ४० आयोजित “खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा”

शिवसेना दिंडोशी विधानसभा शाखा क्र. ४० आयोजित “खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा”


मुंबई चे उपमहापौर, प्रभाग क्र. ४० चे नगरसेवक अ‍ॅड. सुहास चंद्रकांत वाडकर यांच्या आयोजना खाली शाखा संघटक सौ. पदमा राऊळ, शाखा समन्वयक सौ. सुवर्णा खांबेकर व सौ. साक्षी सुहास वाडकर यांच्या नियोजना खाली जागतिक महिला दिना निमित्त गुरुवार, दि. १० मार्च २०२२ रोजी नागरी निवारा विद्यालय मैदान, प्लॉट नं. ०८ येथे प्रभागातील महिला, भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या सन्माना व्हावा या करिता “खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा” या कार्यक्रमाचे आयोजन केले. सुमारे १५०० महिलांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवला. विभागातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या कार्यक्रमातून करण्यात आला. एकूण २५ विजेत्यांना पैठणी देण्यात आल्या व कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या सर्व महिलांना एक आकर्षक भेट वस्तू देण्यात आली.

सदर कार्यक्रमास महिला विभाग संघटक सौ. साधनाताई माने, आमदार यांच्या पत्नी सौ. सायली सुनिल प्रभू, विधानसभा संघटक सौ. पूजा चौहान, सौ. रिना सुर्वे, उपविभाग संघटक सौ. विद्या गावडे, सौ. सानिका शिरगावकर, विधानसभा समन्वयक सौ. आशा केणी, सौ. वैभवी पाटील, उपविभाग समन्वयक सौ. विनिता विचारे, शाखा संघटक श्रीमती संजीवनी रावराणे, सौ. रुपाली शिंदे, शाखा समन्वयक सौ. मिनल साळवी, युवा सेना युवती विभाग अधिकारी सौ. श्रुतिका मस्तेकर-मोरे, युवती शाखा अधिकारी कु. कोमल मोरे, व शिवसेना दिंडोशी विधानसभा शाखा क्र. ४० च्या सर्व महिला/पुरुष उपशाखाप्रमुख/उपशाखासंघटक, गटप्रमुख/गटसंघटक, शिवसैनिक व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button