आमची मुंबईबीडमहाराष्ट्रविशेष

लोडशेडिंगचे संकट ही ठाकरे सरकारच्या निष्क्रियता ‍‌‌
आमदार लक्ष्मण पवार

भारनियमन तात्काळ बंद करा निवेदनाद्वारे केली मागणी

लोडशेडिंगचे संकट ही ठाकरे सरकारच्या निष्क्रियता ‍‌‌
आमदार लक्ष्मण पवार
भारनियमन तात्काळ बंद करा निवेदनाद्वारे केली मागणी
प्रतिनिधी गेवराई – (संकेत खेडकर)
संपूर्ण महाराष्ट्रावर लादलेले लोडशेडिंगचे संकट हे राज्यातील ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेचे उत्तम उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी लोडशेडिंग बंद करा असे निवेदन उपकार्यकारी अभियंता वीज वितरण यांना देताना व्यक्त केली.


पुढे आमदार पवार म्हणाले की पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये प्रचंड कुणाची यशकथा वाढलेली असताना वीज वितरण कंपनीने सुरू केलेल्या लोडशेडिंगमुळे नागरिकांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत रमजानच्या महिन्यामध्ये उपवास रोजा करणाऱ्या लहान मुलासह आबालवृद्धांना व माता-भगिनींना लोडशेडिंगमुळे घरात बसून राहणे असाहा झाले आहे तरी वाढली उन्हाची तीव्रता पाहता घराबाहेर पडणे म्हणजे उष्माघाताचा आमंत्रण देऊन आपला जीव गमावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत जगायचे कसे यक्षप्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.

याचबरोबर या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची वाट निश्चित करण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जायचे आहे त्यामध्ये शालीये महाविद्यालयीन परीक्षा बरोबरच मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा इंजीनियरिंग प्रवेश पूर्व परीक्षा इतर व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठीच्या पूर्व परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षा परीक्षेचा काळ असताना सुरू केलेली ही लोडशेडिंग परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करणारी आल्याचेही आमदार पवार म्हणाले ये लोडशेडिंगमुळे शेतकरी व्यापारी विद्यार्थी आणि सामान्य माणूस या प्रतीक्षेत हाल होताना पाहायला मिळत आहे उन्हाळ्याचे दिवस येत हेत त्यामध्ये पवित्र रमजान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती रामनवमी हनुमान जयंती व परीक्षेचा काळ या काळात लोडशेडिंग संकट निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारने अगोदरच नियोजन करणे आवश्यक होते परंतु सरकारचे 5 कार्यकाळ कसा पूर्ण करेल याकडे लक्ष आहे मग त्यासाठी काहीही करण्याची तयारी या आघाडी सरकारच्या तिन्ही घटक पक्षाची आहे वीज वितरण कंपनीने शेतकऱ्याकडून घरगुती ग्राहकांकडून वीज बिलाच्या माध्यमातून गोळा केलेला प्रचंड पैसा वीज ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देणे ऐवजी आघाडी सरकारने आपलीच वसुली आहे असे समजून खिशात घातला की काय अशी शंका निर्माण झाली आल्याचेही आमदार पवार म्हणाले .

शेवटी आमदार पवार म्हणाले की फडणवीस सरकारने भर नियम लोडशेडिंग मुक्त केलेल्या महाराष्ट्राला या निष्क्रिय आघाडी सरकारने लोडशेडिंग युक्त बनवले आहे या ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करतो आणि लोडशेडिंग बंद नाही झाली तर लवकरच जिल्हा स्तरावर माननीय पंकजाताई मुंडे यांच्याशी चर्चा व्यापक आंदोलन केले जाईल असे इशाराही त्यांनी दिला
त्यावेळी उपस्थित कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार युवा नेते शिवराज दादा पवार व भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button