आपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रशैक्षणिक

कोकण सुपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांचा नि:शुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचा झंझावात: नाबाद १००

कोकण सुपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांचा नि:शुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचा झंझावात: नाबाद १००

महाराष्ट्रातील व प्रामुख्याने कोकणातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे कसे वळतील, शासकीय नोकरी मधील त्यांची टक्केवारी कशाप्रकारे वाढेल, ग्रामीण भागातील व गोरगरीब विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन कशाप्रकारे प्राप्त होईल, कोकण बोर्ड सलग अव्वल स्थानावर येतो परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये तेवढे झळकत नाहीत याचा संशोधनात्मक विचार करून शासकीय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचा झंझावात करणारे मूळ सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावचे व मुंबईत वास्तव्यास असणारे, सिंधू तसेच कोकण सुपुत्र, माननीय श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार (JHT EXAM 2017, AIR 166) यांनी “न भूतो न भविष्यती” स्वरूपात व्याख्यानांचे शतक साजरे केलेले आहे.

शून्यातून शिखर गाठणारे, प्रेरणादायी व्याख्याते व शासकीय अधिकारी, आपल्या कोकणाशी तसेच महाराष्ट्र शी असलेली मातीची नाळ कायम ठेवत व स्वतः अधिकारी झालो तरी समाजाचे देणे फेडण्यासाठी, केवळ वक्तव्य न करता प्रत्यक्ष कृतीद्वारे ऑफलाईन व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण कोकणामध्ये “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने ज्ञानगंगा आणली आहे. सर्व व्याख्याने नि:शुल्क असून माननीय रेडकर सर एकही रुपया मानधन किंवा प्रवास भत्ता घेत नाहीत.

रविवार, दिनांक १९ जून २०२२ रोजी बालक मंदिर संस्था कल्याण, गिरगाव माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गिरगांव, ता. तलासरी, जि. पालघर येथे जवळपास विक्रमी ४०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हे १००वे निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पार पडले. पावसाचा व्यत्यय आला तरी भर पावसात विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक व्याख्यानाचा तसेच मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आगामी शतकोत्तर व्याख्याने दिनांक २५ तसेच २६ जून २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, कुडाळ व कणकवली तालुक्यात आयोजित केली गेली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button