आमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्र

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात बजावले समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणातून समन्स बजावले आहे. जुन्या एका प्रकरणात त्यांचा संबंध आढळल्याने त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. ५ जुलैला संजय पांडे यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नुकतेच संजय पांडे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड झाली आहे.

३० जूनला संजय पांडे यांची सेवा निवृत्ती झाली. सेवा निवृत्ती होऊन चार दिवस उलटत नाहीत तोवर त्यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीचे समन्स आले असुन परवा दिनांक ५ जुलै सकाळी ११.३० वाजता त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जुन्या एका मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांना हि नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button