दापोलीमहाराष्ट्रमुंबईरत्नागिरी

श्री मरीआई मित्र मंडळ, कोकंबाआळी दापोली येथे वृक्षारोपण कार्यक्रम आनंदात साजरा

श्री मरीआई मित्र मंडळ, कोकंबाआळी दापोली येथे वृक्षारोपण कार्यक्रम आनंदात साजरा

श्री मरीआई मित्र मंडळा मार्फत कोकंबाआळी दापोली येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम हा सकाळी ११ वाजताच्या सुमरात सुरू करण्यात आला.


मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्निल पारकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे अवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास मंडळाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाचे वृक्षारोपण राबवण्याचे हे 3 रे वर्ष आहे असे माजी अध्यक्ष व माजी नगर सेवक केदार परांजपे यांनी सांगितले व सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.


सर्वप्रथम स्थानिक नगर सेवक सौ. कृपा घाग यांच्या हस्ते आवळ्याचे झाड लावून करण्यात आली तसेच माजी नगरसेवक नितीन शिंदे, माजी सरपंच तथा उद्योजक दिनेश नायक, घाडगे सर, राजीव करंदीकर, डॉक्टर बागडे, तसेच मंडळाचे सर्व सदस्य, कोकंबा आळीतील ग्रामस्थ व मित्र परिवार याच्या हस्ते व मदतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय आनंददायी वातावरणात व वरुणराजच्या साक्षीने पार पडला. वृक्षारोपणात आवळा, गुलमोहर, कडीलिंब,सोनचाफा अश्या झाडांचा समावेश होता. कोकंबा आळीतील ग्रामस्थ राजीव करंदीकर यांनी मंडळाला उत्तम मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या त्याच प्रमाणे स्थानिक नगर सेविका सौ. कृपा घाग यांनी सध्या जगात ग्लोबर वोर्मिंग व कॉक्रीटीकरण यामुळे किती नुकसान होत आहे अश्या प्रकारचे भेडसावत असणारे मुद्दे व आपल्या जीवनात झाडांचे महत्त्व किती आहे हे त्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना पटवून दिले.


मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल पारकर यांनी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या बद्दल आभार मानले व असेच सहकार्य मंडळाला वेळोवेळी मिळावे अशी आशा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button