आपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रशैक्षणिक

अंधेरी पश्चिम येथे मोहसीन हैदर मा नगरसेवक व अध्यक्ष खिदमत ओर्गानाझेशन यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या परीक्षेत विशेष गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एसएससी टॉपर्स फेलिसिटशन ’ कार्यक्रमाचे आयोजन

अंधेरी पश्चिम येथे मोहसीन हैदर मा नगरसेवक व अध्यक्ष खिदमत ओर्गानाझेशन यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या परीक्षेत विशेष गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एसएससी टॉपर्स फेलिसिटशन ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक शुक्रवार 7 ऑक्टोबर २०२२ रोजी खिदमत ओर्गानिझेशन तर्फे प्रत्येक वर्ष हे कार्यक्रम केले जाते या वर्ष ही मोहसीन हैदर मा नगरसेवक व अध्यक्ष खिदमत ओर्गानाझेशन व नगरसेविका मेहेर हैदर यांच्या मार्गदर्शनाखाली 70% पेक्षा जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्‍यांचा एसएससी टॉपर्स फेलिस्टेशन स्टेशन” जानकीबाई हॉल ,भवन्स कॉलेज जवळ , अंधेरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आला .

यात एस एस सी मध्ये गुरव साई रोहिदास याने 95.20% गुण मिळवून प्रथम, क्रमांक पटकावला आणि त्यांना संगणक, ट्रॉफी, प्रमाणपत्र शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक पटकावला संचिता नागेश कालसगौंडे यांनी ९४.२०% , शेख हफसा इस्माईल याने ९३.४०, खान अलींना अयाज यांनी ९३.२० अंक मिळवून विद्यार्थ्यांना अँड्रॉइड फोन, ट्रॉफी , प्रमाणपत्र व शॉल देऊन सन्मानित करण्यात आले.

इतर 70 पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रमाणपत्र व शाल देऊन गौरविण्यात करण्यात आले. यावेळी मोहसीन हैदर म्हणाले की, “शासनाकडून गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन आणि फीसाठी देण्यात येणाऱ्या योजना यासाठी विद्यार्थीयांना
करिअर समुपदेशनासाठी श्री अखलाक अहमद यांच्याशी संपर्क साधावा आणि किंवा आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

हा कार्यक्रम सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि भविष्यात अधिक चांगले कार्यक्रम राबविण्यात येतील ” सुफियान हैदर यांनी देखील वचन दिले की पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाची सतत नेहमीच चालू राहील.

यावेळी इतर वक्त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला श्री राजीव गांधी अध्यक्ष एआरसी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.श्री राकेश कोठारी (शांती देवी ट्रस्ट), श्री राजन चंडोक (ट्रस्टी वर्सोवा वेल्फेअर), श्री. मुस्तफा पंजाबी (स्कॉलर), निसार खान (अधिक्षक शाळा), श्री. दिनेशभाई जोशी- अध्यक्ष एआरसी, विनोदभाई मेहता सचिव एआरसी, नवाज हाफिज खान (अध्यक्ष मुंबई उर्दू स्कूल), सुफियान (अध्यक्ष उत्तर पश्चिम जिल्हा युवक काँग्रेस) रेहमान हैदर (उपाध्यक्ष – स्लिम सेल), सलीम खान (अध्यक्ष ब्लॉक 66), गुलाम खान. अहमद शेख (उपाध्यक्ष उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस), इम्रान पठाण (अध्यक्ष प्रभाग क्र. 66 युवक काँग्रेस) व मोठ्या संख्येने पालक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button