अंधेरी पश्चिम विधानसभाआमची मुंबईमहाराष्ट्रसामाजिक

शिवसेना (UBT) अंधेरी पश्चिम विधानसभा करणार १५० गरजू नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

विभागातील जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आयोजक सुनिल जैन खाबिया आवाहन केले आहे.

मुंबई – सामाजिक कार्य करत विभागांतील नागरिकांना अधिकाधिक लाभ उपलब्ध करून समाजकारण करणारे राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनिल जैन खाबिया. यांचे कार्यक्षेत्र असलेल्या अंधेरी पश्चिम विधानसभेत पक्षाच्या माध्यमातून सातत्याने लोकहिताचे अभियान राबवितात तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम समर्पकपणे करत आहेत. “८०% टक्के समाजकारण व २० % राजकारण” या शिवसेनेच्या ब्रिदवाक्याप्रमाणे काम करत आहेत. अंधेरी पश्चिम विधानसभेचे सर्व पदाधिकारी एकजुटीने मोठ्या प्रमाणात जनसेवा करत आहेत.

मोतीबिंदू आजाराचा त्रास असणाऱ्या गरजू नागरिकांची रोटरी क्लब इलिगंट व डॉक्टर आय इन्स्टिटयूट च्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लाभार्थी व्यक्ती अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात राहणारा व त्याचे वीज देयक १००० (एक हजार) पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच केशरी रेशनकार्ड असावे. भाड्याने राहणाऱ्या व्यक्तींना भाडे करारनामा व वीज देयक ग्राह्य धरले जाईल असे पात्रता निकष असून गरजू व्यक्तींनी त्वरित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेत संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्या १५० नागरिकांना हा लाभ दिला जाणार आहे. कमीत कमी वेळेत त्वरित शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे नियोजन सुनिल जैन खाबिया यांनी केलेले आहे. आपल्या आजूबाजूच्या गरजू या संदर्भात माहिती द्यावी व या पुण्य कार्यात सहभाग नोंदवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button