अंधेरी पश्चिम विधानसभाआपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रराजकीय बातमी

आमदार अमीत साटम यांची 2024 साठी उत्तर पश्चिम जिल्हा लोकसभा प्रमुख म्हणून निवड

अमीत साटम नगरसेवक ते आमदार आणि आता आमदार ते खासदार असा प्रवास होण्याची शक्यता

अंधेरी पश्चिम विधानसभेची तोफ म्हणुन ओळखले जाणारे आमदार Ameet Satam अमीत साटम यांचा 2012 ते 2017 नगरसेवक नगरसेवक असतानाच 2014 विधानसभा निवडणुकीत बाजी मारून आमदार आणी 2017 च्या मुंबई महानगर पालिका निवडणुक मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष असताना 22 पेक्षा जास्त नगरसेवक निवडूण आणण्याचे काम तर त्याच वेळी अंधेरी पश्चिम विधानसभचे प्रतिनिधित्व करत असताना 7 पैकी 5 नगरसेवक निवडून आणण्याचे काम आमदार अमीत साटम यांनी केले होते विशेष म्हणजे या पाचही नगरसेवक यांनी या आधी कधीही निवडणूक जिंकली न्हवती .

आता भारतीय जनता पक्षाने आमदार अमीत साटम यांच्यवर 2024 च्या लोकसभा निवडणुक प्रमुख म्हणुन जवाबदारी टाकली असून इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय असे वाटू लागले आहे जसे 2012 ला नगरसेवक होताच के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष म्हणुन जवाबदारी घेतली 2012 ते 2014 निवडणूक पर्यंत अंधेरी पश्चिम न्हवे तर पूर्ण के पश्चिम विभाग पिंजून काढला . 2014 मध्ये भाजपा सेना युती तुटली आणि अमीत साटम यांना विधानसभेची तिकीट मिळाली ( त्यावेळी काही काँग्रेस नेते तर अमीत साटम यांना भाजपा तिकीट देणारच नाही आणि जरी दीले तरी पराभव निश्चित होणार अशी वल्गना करत होते) पण आमदार अमीत साटम यांनी पहिल्याच नगरसेवक टर्म मध्ये आपल्या वॉर्ड क्रमांक ६२ चा (जुना वॉर्ड) विकास केला आणि प्रभाग समिती अध्यक्ष होताच आपल्या कामाची छाप पूर्ण के पश्चिम विभाग वर
पाडली.

आता योगायोग असा की लोकसभा निवडणुक २०२४ एप्रिल मध्ये होणार आहे आणि विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त आहे म्हणजे आमदार अमीत साटम यांना लोकसभे साठी उत्तर पश्चिम जिल्हा मधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले तर मागील सर्व इतिहास पाहता आमदार अमीत साटम यांची खासदार होण्याची शक्यता दिसुन येत आहे. जसे नगरसेवक असताना झाले आमदार तसेच आमदार असताना होऊ शकतात खासदार..

म्हणणे नगरसेवक पासून आमदार ते खासदार असा प्रवास होण्याची शक्यता दिसुन येत आहे..

आता येणारा काळच ठरवेल की इतिहासाची पुनरावृत्ती होते की नवीन इतिहास घडतो कारण २०२४ मध्ये अंधेरी पश्चिम विधानसभा निवडणुकीत हट्रिक मारून १९९४ पासून आता पर्यंत कोणत्याही आमदार दोन टर्म पेक्षा जास्त आमदार राहिले नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button