आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेष

जोशी सरांचा संघर्ष म्हणजे भीक नाही – संजय पांडे यांचे संजय निरुपम यांना प्रत्युत्तर

जोशी सरांचा संघर्ष म्हणजे भीक नाही – संजय पांडे यांचे संजय निरुपम यांना प्रत्युत्तर.

केवळ सत्ता मिळविण्यासाठी पक्ष सोडणाऱ्यांना सुद्धा भिकारीच म्हणावं लागेल – संजय पांडेय
(प्रदेश अध्यक्ष भाजपा उ.भा.मो.)

मुंबई – काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या विधानावर महाराष्ट्र भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी सडकून टीका केली आहे, ज्यात निरुपम यांनी मनोहर जोशींना भीक मागून अभ्यास केला असे विधान केले आहे. जोशी साहेबांनी जीवनात कठोर संघर्ष केला असल्याचे संजय पांडे सांगतात. त्यांच्या कष्टाला आणि परिश्रमाला भीक म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.संजय निरुपम सध्या हताश झाले आहेत त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी जी हे आपल्या सर्वांसाठी सदैव आदरणीय होते आणि राहतील.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. यावर शिवसेनेचे माजी नेते आणि सध्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी त्यांना श्रध्दांजली देणारी पोस्ट X वर लिहली आहे ज्यात त्यांनी मनोहर जोशी हे कोकणातील अत्यंत गरीब कुटुंबातील होते. मुंबईत घरोघरी भीक मागून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे ते शिक्षक झाले, त्यांनी कोहिनूर कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू केली.

संजय निरुपम यांचे ट्विट

निरुपम यांच्या या विधानावर टीका करताना संजय पांडे म्हणाले की, मनोहर जोशी हे सर्वसामान्य गरीब कोकणी ब्राह्मण कुटुंबातील होते. त्यांनी जीवनात खूप कष्ट आणि संघर्ष केला. ते मुंबईचे महापौर झाले. राज्याचे मुख्यमंत्री झाले. संसद, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे ते सदस्य होते. केंद्रात मंत्री होते.माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते लोकसभेचे अध्यक्ष होते. सर या नावाने प्रसिद्ध असलेल्या जोशी सरांच्या संघर्षाला भीक मागणे पूर्ण पणे चुकीचे आहे. भीक मागणे अपमान करण्यासारखे आहे. एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीने आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाकडेही मदत मागितली तर त्याला भीक मागत नाही तर जीवनाचा संघर्ष म्हणतात. अन्यथा केवळ सत्ता मिळविण्यासाठी पक्ष सोडणाऱ्यांना सुद्धा भिकारीच म्हणावं लागेल.

संजय पांडे उत्तर भारतीय मोर्चा (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) यांचे ट्विट

महाराष्ट्र भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या एका पत्रावर मुख्यमंत्रीपद सोडणारे जोशी सर होते आणि बाळासाहेबांनी राज्यसभेवर न पाठवल्यावर शिवसेना सोडणारे निरुपम आहेत. ज्या काँग्रेसला ते सतत शिव्या द्यायचे, सोनिया गांधीला बार बाला म्हणायचे त्याच काँग्रेसच्या मांडीवर ते आता ठाण मांडून बसले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button