आमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेषशैक्षणिकसामाजिक

सर्वपक्षीय नगरसेवक अडचणीत! मुंबई महापालिकेतील ७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; जात प्रमाणपत्र, खोटी माहिती, गुन्हेगारी व संपत्तीच्या घोषणांवरून याचिका

५ नगरसेवकांची निवड बाद; शिवसेना उबाठा २४, भाजप १६, काँग्रेस १० याचिकांसह सर्वच प्रमुख पक्षांना कायदेशीर आव्हान

सर्वपक्षीय नगरसेवक अडचणीत! मुंबई महापालिकेतील ७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; जात प्रमाणपत्र, खोटी माहिती, गुन्हेगारी व संपत्तीच्या घोषणांवरून याचिका

 

५ नगरसेवकांची निवड बाद; शिवसेना उबाठा २४, भाजप १६, काँग्रेस १० याचिकांसह सर्वच प्रमुख पक्षांना कायदेशीर आव्हान

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही विजयी उमेदवारांची डोकेदुखी कायम असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी विजयी नगरसेवकांच्या निवडीला विविध कारणांवरून आव्हान दिले असून, एकूण ७९ याचिका दाखल झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

 

या पार्श्वभूमीवर नुकतेच माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद बाद झाल्याने निवडणूक याचिकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका निवडणुकीत मिळालेला विजय हा अंतिम मानला जात नसून, निवडणूक प्रक्रियेतील कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रातील माहिती, जात प्रमाणपत्र तसेच उमेदवाराने केलेल्या विविध घोषणांची कायदेशीर तपासणीही महत्त्वाची ठरत असल्याचे या घटनाक्रमातून स्पष्ट झाले आहे.

 

विशेष म्हणजे, या याचिकांमध्ये केवळ एखाद्या एका पक्षाचे नगरसेवक लक्ष्य नसून मुंबईतील प्रमुख सर्वपक्षीय नगरसेवकांविरोधात निवडणूक याचिका दाखल झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे निवडणुकीनंतर नगरसेवक म्हणून मिळालेले पद किती कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

जात प्रमाणपत्रापासून संपत्तीच्या माहितीपर्यंत आक्षेप

 

पराभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये विविध गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामध्ये जात प्रमाणपत्राची वैधता, उमेदवारांनी सादर केलेली माहिती खोटी अथवा चुकीची असल्याचा आरोप, गुन्हेगारी प्रकरणांची माहिती, तसेच संपत्ती आणि आर्थिक बाबींबाबत दिलेल्या घोषणांवर आक्षेप घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

 

उमेदवार निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रामध्ये विविध वैयक्तिक, आर्थिक आणि कायदेशीर माहिती जाहीर करतात. या माहितीमध्ये विसंगती अथवा चुकीची माहिती असल्याचा आरोप झाल्यास त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे निवडणूक अर्ज आणि प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या प्रत्येक माहितीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

 

शिवसेना उबाठा सर्वाधिक २४ याचिकांमध्ये

 

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार पक्षनिहाय चित्र पाहता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांविरोधात सर्वाधिक २४ याचिका दाखल झाल्या आहेत. त्यानंतर भाजपविरोधात १६, काँग्रेसविरोधात १० आणि शिवसेना (शिंदे) पक्षाविरोधात ७ याचिका दाखल झाल्या आहेत. तसेच एमआयएमविरोधात ५, मनसेविरोधात २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात १ याचिका दाखल झाली आहे.

 

५ नगरसेवकांची निवड बाद

 

७९ याचिकांपैकी आतापर्यंत ५ नगरसेवकांच्या निवडीवर प्रतिकूल परिणाम झाला असून त्यांची निवड बाद करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना उबाठाचे २, एमआयएमचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ नगरसेवक यांचा समावेश आहे.

 

यामुळे निवडणुकीत विजय मिळवणे ही अंतिम पायरी नसून, उमेदवारीपासून प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि निवडणूक प्रक्रियेतील कागदपत्रांची अचूकता तितकीच महत्त्वाची असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

 

निवडणूक पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर

 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या उमेदवारांनी मतदारांसमोर सादर केलेली माहिती अचूक आणि सत्य असणे आवश्यक आहे. त्यामध्ये काही त्रुटी, विसंगती किंवा तथ्य लपविल्याचा आरोप झाल्यास त्याचा परिणाम निवडणूक निकालावरही होऊ शकतो.

 

७९ निवडणूक याचिका आणि त्यापैकी ५ नगरसेवकांची निवड बाद होणे, तसेच माजी महापौर विशाखा राऊत यांचे पद नुकतेच बाद होणे, या घटनांमुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील उमेदवारी व प्रतिज्ञापत्रांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

या पार्श्वभूमीवर उर्वरित याचिकांमध्ये काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण यापैकी आणखी काही नगरसेवकांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास महापालिकेतील पक्षीय संख्याबळावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

निवडणुकीत मतदारांचा कौल मिळवून विजयी झाल्यानंतरही न्यायालयीन कसोटीला सामोरे जावे लागत असल्याने मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या निवडीसमोर कायदेशीर आव्हान उभे राहिले आहे.

 

निवडणूक याचिका दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये मोहम्मद रफीक मुस्तफा हुसेन – प्रभाग 91 ‘एच/पूर्व’, आनंद अनिल कोठावडे – प्रभाग 130 ‘एन’, ज्योती अनिल उपाध्याय – प्रभाग 90 ‘एच/पूर्व’, चेतन श्रीधर बेलकर – प्रभाग 85 ‘के/पूर्व’, मोहम्मद सलीम कुरेशी – प्रभाग 92 ‘एच/पूर्व’, प्रतिमा शैलेश खोपडे – प्रभाग 121 ‘एस’, ललिता कचरू यादव – प्रभाग 175 ‘एफ/उत्तर’, एजाज अहमद खान – प्रभाग 211 ‘ई’, कृष्णा वासुदेव म्हाडगुट – प्रभाग 91 ‘एच/पूर्व’, मनीषा मनोहर पांचाळ – प्रभाग 72 ‘के/उत्तर’, जाहिद युनूस खान – प्रभाग 102 ‘एच/पश्चिम’, रंजिता केतन दिवेकर शिवलकर – प्रभाग 170 ‘एल’, सारिका मंगेश पवार – प्रभाग 111 ‘एस’, विश्वजीत शंकर धोलम – प्रभाग 119 ‘एस’, विनोद उदयनारायण मिश्रा – प्रभाग 43 ‘पी/पूर्व’, संजीव कुमार कालकोरी – प्रभाग 81 ‘के/पूर्व’ व 76 ‘के/उत्तर’, अर्जुन आनंद शिंदे – प्रभाग 138 ‘एम/पूर्व’, संदीप हनुमंत खारत – प्रभाग 119 ‘एस’, फरहीन मोहम्मद जमशेद खान – प्रभाग 119 ‘एस’, प्रिया रुपेश पाटील – प्रभाग 223 ‘बी’, विजय ताराचंद लाम्बा – प्रभाग 176 ‘एफ/उत्तर’, विनोद दामोदर घोगडे – प्रभाग 119 ‘एस’, मोहम्मद मेहफूज शेख – प्रभाग 138 ‘एम/पूर्व’, राजू श्रीपाद पेडणेकर – प्रभाग 62 ‘के/पश्चिम’, समरा फातिमा आरिफ खान – प्रभाग 82 ‘के/पूर्व’, स्मिता शंकर म्हात्रे – प्रभाग 176 ‘एफ/उत्तर’, गौरव अरुण राणे – प्रभाग 57 ‘पी/दक्षिण’, राजुल सुरेश पटेल – प्रभाग 61 ‘के/पश्चिम’, सिद्धार्थ कडाजी उस्तुरे – प्रभाग 140 ‘एम/पूर्व’, शैलेंद्र अनंत मोरे – प्रभाग 55 ‘पी/दक्षिण’, एकता विनोद चौधरी – प्रभाग 80 ‘के/पूर्व’, इब्राहिम युसुफ मुल्ला – प्रभाग 4 ‘आर/उत्तर’, तन्वी दिनेश राव – प्रभाग 50 ‘पी/दक्षिण’, स्नेहा चंद्रशेखर भाटकर – प्रभाग 76 ‘के/उत्तर’, प्रसाद प्रभाकर आयरे – प्रभाग 65 ‘के/पश्चिम’, शीतल अशोक म्हात्रे – प्रभाग 1 ‘आर/उत्तर’, वंदना गौतम साबळे – प्रभाग 151 ‘एम/पश्चिम’, हर्षदा गजानन पाटील – प्रभाग 176 ‘एफ/उत्तर’, जितेंद्र सहदेव राऊत – प्रभाग 99 ‘एच/पश्चिम’, सौ. प्रिया सावर्णकर गुरव – प्रभाग 191 ‘जी/उत्तर’, पायल संदीप नाईक – प्रभाग 82 ‘के/पूर्व’, सौ. गौसिया साजेद अकबर शेख – प्रभाग 78 ‘के/उत्तर’, संजय बाबुराव अव्हाड – प्रभाग 40 ‘पी/पूर्व’, भाग्यलक्ष्मी लालसिंग ताजपुरोहित – प्रभाग 31 ‘आर/दक्षिण’, रुपेश अशोक पाटील – प्रभाग 113 ‘एस’, श्री. दिनेश अनंत साळवी – प्रभाग 20 ‘आर/दक्षिण’, करांजे सुवर्णा सहदेव – प्रभाग 117 ‘एस’, सुमित कुंडलिक वाजले – प्रभाग 93 ‘एच/पूर्व’, सुवर्णा गावस – प्रभाग 12 ‘आर/मध्य’, अश्विनी दीपक हांडे – प्रभाग 128 ‘एन’, दीप्ती वायकर पोटनीस – प्रभाग 73 ‘के/उत्तर’, राजराजेश्वरी अनिल रेडकर – प्रभाग 120 ‘एस’, विनया विष्णू सावंत – प्रभाग 39 ‘पी/पूर्व’, विजय सुधाकर म्हाडिक – प्रभाग 34 ‘पी/उत्तर’ आणि रुपल राजेश कुसाळे – प्रभाग 199 ‘जी/दक्षिण’ यांचा समावेश आहे. तसेच संजय नाना गजानना अंबोले – वार्ड 206, एफ/साऊथ, विजय कृष्णा पाटील – वार्ड 10, आर/सेंट्रल, वृशाली सुरेश हुंडारे – वार्ड 28, आर/साऊथ, सलमा सलीम अलमेलकर – वार्ड 48, पी/नॉर्थ, श्रद्धा शरद प्रभू – वार्ड 71, के/वेस्ट, दीपक रामनिवास फलोद – वार्ड 145, एम/ईस्ट, समिधा शिल्पा संदीप भोळेकर – वार्ड 203, एफ/साऊथ, पूजा रामदास कांबळे – वार्ड 173, एफ/नॉर्थ, अंबोलकर प्रियांका प्रशांत – वार्ड 77, के/नॉर्थ, शोभा दिनकर जयभाये – वार्ड 143, एम/ईस्ट, आशा मामिडी – वार्ड 213, ई-वार्ड, राजेश प्रकाश नाईक – वार्ड 89, एच/ईस्ट, विजय अरुण लिपारे – वार्ड 208, ई-वार्ड, वंदना प्रदीप गवळी – वार्ड 198, जी/साऊथ, मानसी दिलीप पावसकर उर्फ मानसी प्रथमेश पाटील – वार्ड 41, पी/ईस्ट, पल्लवी अशोक पै – वार्ड 94, एच/ईस्ट, झरीना अख्तर कुरेशी – वार्ड 139, एम/ईस्ट, अशोक बच्चू खांडवे – वार्ड 53, पी/साऊथ, ऋषिता मंगेश चाचे – वार्ड 38, पी/ईस्ट, तरुण महेश कुंभार – वार्ड 80, के/ईस्ट, शेख वकील सगीर अहमद – वार्ड 187, जी/नॉर्थ यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button