आमची मुंबईकोल्हापूरमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमी

के. पी. पाटलांचं अखेर ठरलं… हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं , अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश…..

 राधानगरी विधानसभेचे माजी आमदार, बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केला जय महाराष्ट्र

के. पी. पाटलांचं अखेर ठरलं… हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं , अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश…..

उप संपादक ( सतिश अस्वले- पाटील) –  राधानगरी विधानसभेचे माजी आमदार, बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जय महाराष्ट्र करून स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, के. पी . पाटील यांना काही पर्यायी मार्ग स्वीकारावे लागले पण त्यांच्या मनातील राष्ट्रवादीचे स्थान आढळ राहिले. त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चितपणे फायदा होईल.

 

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी के. पी. पाटील आणि आपली मैत्री अढळ राहिली आहे. आता त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला आणखी उभारी घेता येणार आहे. त्यांना ताकद देण्याचे काम निश्चितपणे केले जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले

बिद्री कारखान्याच्या उभारणीत अजितदादांनी मोलाचे योगदान दिले आहे. हसन मुश्रीफ यांनी पाठराखण केल्याने राजकीय वाटचाल करता आली, अशी कृतज्ञता व्यक्त करत के. पी. पाटील म्हणाले, साखर कारखाना, सूतगिरणी, शिक्षण संस्था आदी संस्थात्मक काम अधिक प्रभावीपणे करतानाच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी विजयी होण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले जातील.

 

पण या के पी पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आत्ताचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे केपी पाटील आता महायुतीत सामील झाल्यामुळे त्यांना पालकमंत्री असलेल्या प्रकाश आबिटकर यांच्यासोबत काम करावे लागणार आहे, आत्ता के पी पाटील युती धर्म पाळणार की प्रकाश आबिटकर यांच्या विरोधातच राहणार हे येणारा काळ ठरवेल,

 

विधानसभेत के पी पाटील हे ठाकरे गटात गेले होते त्यामुळे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांना डावलून के पी पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिले पण के पी पाटलांचा दारुण पराभव हा प्रकाश आबिटकर यांनी केला त्यामुळे राधानगरी विधानसभेतील कट्टर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती तेथील स्थानिक शिवसैनिकांना आधीच माहिती होतं की के पी पाटील फक्त निवडणुकीपुरते आपल्याकडे आलेले आहेत जरी निवडून आले तरी ते आपल्या पक्षात राहणार नाहीत जसे अजित पवार म्हणाले शरीराने जरी ते तिकडे असतील तरी मनाने ते राष्ट्रवादीत होते तसेच झालं पण ज्या उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांनी के पी पाटील यांना शिवसेनेत आणून तिकीट दिलं त्या नेत्यांनी आपला निर्णय योग्य होता की अयोग्य हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे, के पी पाटलांना शिवसेनेत आणून एका सैनिकाचा बळी घेतला अशी भूमिका असं मत राधानगरीतील काही शिवसैनिकांच आहे

के पी पाटलांसोबत काम करणारे काही ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत होते ते आता ठाकरे गटात राहणार की केपी पाटलांसोबत राष्ट्रवादीत जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button