आमची मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी दिली समीर जाधव यांच्या “जाधवांचा मोरया” बाप्पाला भेट

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे हिने काढली  समीर जाधव यांच्या "जाधवांचा मोरया" ची दृष्ट

 

मुंबई :जाधवांच्या मोरयाला यंदा १८ वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणेच या वर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

 

सुप्रसिद्ध “चला हवा येऊ द्या” फेम अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी पती निखिल सेठ यांच्यासह समीर जाधव यांच्या घरच्या बाप्पाला भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी जाधव कुटुंबीयांनी श्रेया बुगडे यांचे मनापासून स्वागत केले.

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे हिने  समीर जाधव यांच्या “जाधवांचा मोरया” याला दृष्ट लागू नये म्हणुन  ची दृष्ट काढली

यावेळी समीर जाधव आणि सौ. सरिता जाधव यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाच्या मंडपाची देखणी सजावट करण्यात आली असून, सुबक रचना व सुवर्ण अलंकार यामुळे मोरयाचे आकर्षण आणखी वाढले आहे.”

जाधव परिवार गेली अनेक वर्षे गणेशोत्सव सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. मित्र परिवाराच्या अथक प्रयत्नातून सिद्धी विनायकासह अनेक उपक्रम राबवले जातात.

दरम्यान, श्रेया बुगडे यांनी बाप्पाच्या दर्शनानंतर सांगितले की, “जाधवांच्या मोरयाची प्रतिष्ठा खरोखरच अप्रतिम असून, भक्तीभावाने सजवलेल्या बाप्पाचे दर्शन घेताना दिव्यता जाणवते.जाधवांचा मोरया २०२५ मध्येही लाडक्या गणरायाचे भक्तीमय वातावरण निर्माण करत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button