आमची मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईविधीविशेषसामाजिक

सह्याद्री क्रीडा मंडळाचा एक होळी—एकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते विधीवत झाले होलिका दहन

मुंबई – एक होळी—एकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेशमागील १७ वर्षांपासून “एक होळी” ही सामाजिक एकतेची संकल्पना जपत महाराष्ट्र राज्यातील नामवंत सह्याद्री क्रीडा मंडळ सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमातून जात-धर्म-भेद न मानता सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा सकारात्मक संदेश दिला जातो.

यावर्षी टिळक नगर येथे आयोजित करण्यात आलेले होलिका दहन माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते विधीवत पार पडले. पारंपरिक विधींसोबतच सामाजिक ऐक्य, सौहार्द आणि शांततेचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आला.

 

या प्रसंगी सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज, उपाध्यक्ष अमित सातार्डेकर, नगरसेवक सुषमा सावंत, गुरुनाथ मिठबावकर, खजिनदार जया शेट्टी, सेक्रेटरी राजेंद्र मोहिते, टिळक नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले. “एक होळी” या उपक्रमामुळे परिसरात बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सह्याद्री क्रीडा मंडळाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, पुढील काळातही अशीच सामाजिक एकोपा वाढवणारी कार्ये सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button