आमची मुंबईआरोग्यमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

मेडिकल इन्शुरन्स क्लेमच्या त्रासावर महाराष्ट्र सरकारची दखल; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

ऍड. भिमेश मुतुला यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांचे आ मानले

 

मेडिकल इन्शुरन्स क्लेमच्या त्रासावर महाराष्ट्र सरकारची दखल; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

मुंबई :

महाराष्ट्रातील नागरिकांना मेडिकल इन्शुरन्स क्लेम मिळताना होणारा त्रास, कॅशलेस उपचार नाकारणे, अवाजवी वैद्यकीय बिले आणि क्लेम रिजेक्शन यांसारख्या गंभीर समस्यांवर महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे.

दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ऍड. भिमेश मुतुला यांनी या विषयावर राज्य सरकारकडे सविस्तर निवेदन सादर करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्याची दखल घेत दि. १० मार्च २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत विमा कंपन्या, खासगी रुग्णालये, Insurance Regulatory and Development Authority of India (IRDA) आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

 

बैठकीत रुग्णांना विम्याचा लाभ घेताना होणारा त्रास कमी करणे, अवाजवी वैद्यकीय बिले थांबवणे, सर्व रुग्णालयांची IRDA पोर्टलवर नोंदणी बंधनकारक करणे, उपचारांचे दरपत्रक पारदर्शकपणे प्रदर्शित करणे आणि क्लेम मंजुरीसाठी निश्चित कालमर्यादा ठरवण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

तसेच हॉस्पिटल आणि विमा कंपन्यांमधील समन्वय सुधारण्यासाठी उपाययोजना, एकाच आजारासाठी वेगवेगळे दर टाळण्यासाठी Standard Treatment Protocol तयार करणे आणि Common Empanelment System निर्माण करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी Bombay Nursing Act अंतर्गत कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच विमा कंपन्यांनी क्लेम रिजेक्शनचे प्रमाण कमी करावे आणि रुग्णालयांनी मंजूर किंवा नाकारलेल्या क्लेमची माहिती आरोग्य विभागाला सादर करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

 

या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील लाखो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून आरोग्य व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वास वाढण्यास मदत होणार आहे.

याबाबत सकारात्मक दखल घेत नागरिकांच्या हितासाठी पावले उचलल्याबद्दल ऍड. भिमेश मुतुला यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button