आपली मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेष

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार शासन प्रशासनावर कायदेशीर कारवाई करणार.

मानवी हक्क दिनी हक्काची पायमल्ली झाल्यामुळे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अँड सतीशचंद्र रोठे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार शासन प्रशासनावर कायदेशीर कारवाई करणार..

सुसाईड नोट च्या आधारावर गुन्हे दाखल करनार…

बदली,सेवा समाप्ती, निलंबन च्या धमक्या देऊन कामावर येण्यास दमदाटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करणार..

मानवी हक्क दिनी हक्काची पायमल्ली झाल्यामुळे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अँड सतीशचंद्र रोठे.

एसटी महामंडळ शासनात विलनिकरनासाठी कर्मचाऱ्यांचा सामूहिक दुखवटा अंतिम टप्प्यात आहे. कायदेशीर लढाई एसटी कर्मचारी जिंकणारच आहेत. त्यामुळेच हादरलेले शासन-प्रशासन कामगारांच्या आत्महत्यांची थट्टा करीत जखमेवर चोळण्याचे काम मानवी हक्क दिनी करत आहे.
त्यामुळेच दुखवटा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
यापूर्वी पगार आणि पोटाच्या भाकरी मुळे आत्महत्या कामगारांनी केल्या. परंतु आता निलंबन, सेवा समाप्ती, बदली आणि कामावर येण्याच्या धमक्यांमुळे एसटी कर्मचारी कामगारांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.


आज पर्यंत 56 आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या असून, सात ते आठ कर्मचारी अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. ज्या कामगार, कर्मचाऱ्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली त्यानुसार कायदेशीर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर अधिकारी एसटी कर्मचाऱ्यांना,कामगारांना निलंबन, सेवा समाप्ती बदलीची धमकी देऊन कामावर रुजू होण्यास भाग पाडत आहे. त्यामुळेही एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या आणि विष प्राशन दैनंदिन होत आहे. त्यासंदर्भातील ही सुसाईड नोट आहे. त्यामुळे यापुढे एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी न घाबरता सुसाईड नोट चा आधार घेऊन सरळ आपल्या स्थानीक पोलीस स्टेशनला लेखी तक्रार द्यावी. आणि रिसीव्ह कॉफी घ्यावी. यापुढील लढा आता शासन-प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही लढणार आहोत. असे एका पत्रकाद्वारे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे यांनी मानवी हक्क दिनाचे औचित्य साधत जाहीर केले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️
दिनांक: 10/12/2021.
बुलडाणा

अधिक माहितीसाठी:
9637230999

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button