आपली मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेष

अंधेरी पूर्व महाकाली दर्शन इमारतीमध्ये दहाव्या मजळापासून लिफ्ट कोसळून झाला अपघात

अंधेरी पूर्व महाकाली दर्शन इमारतीमध्ये दहाव्या मजळापासून लिफ्ट कोसळून अपघात झाला

प्रकल्पातील रहिवाशांच्या अनेक तक्रारी समोर आल्याने त्या तक्रारीचे स्वरूप पाहण्यासाठी प्रत्यक्षात मी आणि माझे सहकारी तसेच त्या प्रकल्पातील समस्याग्रस्त असलेले रहिवाशी यांच्यासोबत दिनांक २८ ऑक्टोबरला प्रत्यक्षात पाहणी केली होती त्यात लोकांचे अनेक समस्यांना जाणून घेतला होता आणि हे विषय स्थानिक अधिकारी यांनी लवरकच कारवाई करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे असं समजलं होत किंतु आज पर्यन्त काही झालं नाही मात्र आज सकाळी सुमारे ११:०० वाजता महाकाली दर्शन इमारत एकच्या लिफ्ट दहाव्या मजल्यावरून खाली पडून मोठा अपघात झाला .

या अपघातात तीन लहान मुले व दोन महिलांना जोरदार धक्का बसला त्यांचे नावे शुभम गोसावी वय १६ , अभिषेक पवार वय१५,तुषार चव्हाण वय १५,प्रियंका पांचाळ वय ५०,संगीता पवार हे सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात भेट देत त्याचें तंबीयतिचा विचार पूस करून डॉक्टरांना पूर्ण तपासणी करून त्यांना स्थिर करण्यासाठी सांगितले आहे.

सुदैवाने एक ही जीवहानी झाले नाहीं एक लहान बाळ तुषार चव्हाण हा गंभीरपणे जखमी अवस्थेत कूपर रुग्णालयात उपचार घेत आहे बाकी चे चार रुग्ण आदित्य नरसिंग होममध्ये दाखल आहेत . माझं प्रश्न आपल्या प्रशासनाशी आहे की आज येवढा मोठा अपघातीच्या वाट पाहता अधिकारी झोप काडत होते का ? लोकांच्या प्रश्न व समस्येवर उपाय न काढता लोकांना प्रकल्पात का सोडले अनेक सदनिकांचे हालत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यामुळे भिंतीवरील प्लास्टर, खाली लावलेल्या लाद्या मध्ये पोकळीक निर्माण होऊन पाणी लिकेज होत आहेत अनेकांना घर भाडे मिळाली नाहीं अश्या बरेच समस्या आहेत, इथे समोर उभे राहिल्यावर प्रत्यक्षात दिसून येते मात्र विकासकांच्या आमिषाला बळी पडून एस. आर. ए अधिकारी आपली जबाबदारी पार पडले नाहीं म्हणून माझी मागणी आहे की लवकरात लवकर विकासक ओंकार डेव्हलपर्स विरुद्ध गुन्हा दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आणि महाकाली दर्शन एस. आर. ए संपूर्ण प्रकल्पाचे ऑडिट करून एक चांगल्या दर्जेदार जीवनव्यापन करण्यासाठी लोकांचे अधिकारात जे काही योग्य आहे ते कारवाई करून जखमींना नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावे म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सतीश लोखंडे IAS यांना भिमेश मुतुला (राज्य सचिव) महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना,
संस्थापक/खजिनदार- जन प्रहार फाऊंडेशन यांनी मागणी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button