वसईत “वसई गौरव पुरस्कार २०२२”सोहळा संपन्न

वसईत “वसई गौरव पुरस्कार २०२२”सोहळा संपन्न
वसई तालुक्यातील विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा शानदार सोहळा दि. ६ मार्च २०२२ रोजी ‘ड्रीम अँरीना ‘ सभागृह बरामपूर ,वसईरोड (पश्चिम ) येथे संपन्न झाला. या सोहळयाचे आयोजन व्ही .एस.नेशन व वसई सत्ता चे दवेंद्र खन्ना यांनी केले .

या कार्यक्रमासाठी सुधाकर शर्मा (चुनरी फेम संगीतकार ),तृष्णा प्रीतम (अभिनेत्री ) , शोभा बॅनर्जी (गायिका ),जॉनी निर्मल (हास्य अभिनेता )आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविकपर भाषण दवेंद्र खन्ना यांनी केले . त्यांनी या कार्यक्रमाचा हेतू सविस्तरपणे उपस्थितांना उलगडून दाखवला. या कार्यक्रमासाठी मला सर्व मित्रमंडळींनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना दवेंद्र खन्ना यांनी केलेल्या आयुष्यातील खडतर प्रवासाचे टप्पे उलगडून दाखवले . तसेच हास्य अभिनेता जॉनी निर्मल यांनी विविध किस्से सांगून उपस्थितांचे मनोरंजन केले .
या कार्यक्रमांतर्गत कवी/लेखक/संगीतकार प्रकाश पाटील, नृत्य दिग्दर्शक रोशन घरत,चित्रकार सुभाष गोंधळे समाज सेविका सौ.किरण बढे, समाज सेवक छोटू आनंद, दिगंबर देसाई (वकील ), गायक-संगीतकार मेल्वीन डाबरे, शिक्षक सखाराम भूमकर ,कल्लन खान, प्रकाश हेगडे (हॉटेल व्यावसायिक ), यांच्यासह अनेक गायक ,गायिका ,व विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांना ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच नारीशक्ती सन्मान या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महिलांना व उपस्थित पत्रकारांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ड्रीम अँरीना, सुगो अँडव्हर्टायझिंग, पाटील अँड पवार ज्वेलर्स प्रायोजक म्हणून लाभले तर अँक्रॉस मुंबई, क्राईम न्यूज, सैफ न्यूज आदी मीडिया पार्टनर म्हणून लाभले. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन ग्वेन लाँरेन्स (गायिका ) यांनी केले. दवेंद्र खन्ना यांनी उपस्थितांचे आभार मानले



