LIC ची तत्परता, अर्ध्या तासात मृताच्या वारसाच्या विम्याचे पैसे.विमा प्रतिनधी नितीन आर तापडिया यांचा पुढाकार

LIC ची तत्परता, अर्ध्या तासात मृताच्या वारसाच्या विम्याचे पैसे.
विमा प्रतिनधी नितीन आर तापडिया यांचा पुढाकार
बुलडाणा( )
मृत्यु हे शाश्वत सत्य आहे, मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात या सत्याला केव्हा सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही. मात्र आपण गेल्यानंतर कुटुंबाची व वारसांची हेळसांड होऊ नये,यासाठी LIC अर्थातच भारतीय जीवन विमा निगम ची साथ विश्वासाने निवडली जाते. विमा निगम ची साथ विश्वासाला पात्र ठरत LIC ने विमा धारकाचा मृत्यु संबंधीचा दावा दाखल केल्यानंतर वारसाला अर्ध्या तासात मोबदला मिळवून दिला आहे. बुलढाणा येथील नितीन तापडिया यांनी यासाठी पुढाकार घेत LIC कार्यालयात बाबींसाठी पाठपुरावा केला.

बुलढाणा येथील विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात राहणाऱ्या शैलेश कालावाडिया व त्यांच्या पत्नी सौ. बीनाताई कालावडिया यांनी नितीन तापडिया यांच्या मार्फत विमा काढला होता, दरम्यान सौ. बिनाताई कालावडिया यांचा मृत्यू झाला, यासंबधी कुटुंबाकडे नितीन तापडिया यांनी कालावडिया यांना भेट देऊन वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता करून LIC च्या ब्रिदानुसार ‘ जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी ‘ लगेच कार्यवाही करून आज दिनांक १६ मार्च रोजी ११:४५ दाखल केलेल्या प्रकरणाचा क्लेम अर्ध्या तासात १२:१५ मंजूर करण्यात आला आणि लगेच वारसांना त्यांच्या विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली यासाठी विकास अधिकारी राजेशजी गावली, शाखाधिकारी श्री.महेश पेंडके साहेब सहायक शाखाधिकारी करवते ,दावा विभाग प्रमुख राजेंद्र खानझोडे, उच्च श्रेणी सहायक संजीव घोगटे , भूपेंद्र जोशी, सहायक रवी जाधव व उद्धव वायकोस यांचे सहकार्य लाभले.




