आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषशैक्षणिकसामाजिक

रिक्षाचालकाची मुलगी ‘इच्छा सोनावणे’ने १०वीत मिळवले ९२% गुण, आता BSc IT चे स्वप्न!*

*झोपडपट्टीतून ज्ञानाच्या शिखराकडे वाटचाल

*झोपडपट्टीतून ज्ञानाच्या शिखराकडे वाटचाल — रिक्षाचालकाची मुलगी ‘इच्छा सोनावणे’ने १०वीत मिळवले ९२% गुण, आता BSc IT चे स्वप्न!*

मानखुर्द, मुंबई:

स्वप्नं मोठी असतील तर परिस्थिती लहान वाटते! हे अगदी खरे करून दाखवले आहे मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या कु. इच्छा वनिता संतोष सोनावणे हिने. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिकत, इच्छाने दहावीच्या परीक्षेत ९२% गुण मिळवून संपूर्ण परिसराला अभिमानाची जागा मिळवून दिली आहे. आता तिचे स्वप्न आहे — BSc IT करून एक यशस्वी आयटी इंजिनिअर बनण्याचे.

 

इच्छाचे वडील संतोष सोनावणे सध्या रिक्षा चालवतात. मात्र त्यांचे बालपण खूपच हाल अपेष्टांनी भरलेले होते. एकल महिला असलेल्या त्यांच्या आईला मुलांचे पोषण करणे शक्य नसल्यामुळे, संतोष व त्यांचा लहान भाऊ यांना मानखुर्द येथील बाल कल्याण नगरीतील सरकारी बालगृहात दाखल करण्यात आले. तिथेच संतोष यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे मेहनतीने आयुष्य सावरले.

 

आज, तीच जिद्द आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या मुलीतही रुजवले आहे. इच्छा हिने अभ्यासात सातत्य ठेवून हे यश मिळवले आहे. “मी मोठी होऊन IT क्षेत्रात नाव कमवायचं आहे आणि माझ्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं आहे,” असे ती अभिमानाने सांगते.

या यशामागे फक्त अभ्यास नव्हे, तर संघर्षातून घडलेले संस्कार, आई-वडिलांचे त्याग, आणि शिक्षणावरचा दृढ विश्वास आहे. इच्छाचे हे यश केवळ तिचे नसून, ते हजारो गरीब व संघर्षमय जीवन जगणाऱ्या विद्यार्थ्यांथी व बालगृहातून बाहेर आलेल्या आजच्या पालकांचे स्वप्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button