संत गाडगे बाबा परीट समाज संस्थेच्या वतीने दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी संत गाडगेबाबा मंदिर खेड येथे पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला .

संत गाडगे बाबा परीट समाज संस्थेच्या वतीने दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी संत गाडगेबाबा मंदिर खेड येथे पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी खेड चे प्रथम नागरिक सन्मा. नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेब नगरसेवक भूषणजी चिखले,तालुका प्रवक्ते देवकाते सर,मनविसे मा.जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, शहराध्यक्ष केतन उर्फ राजु आंब्रे,प्रदीप भोसले व मनसे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

त्या वेळी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेब यांनी समाजाला संबोधित करतांना गाडगेबाबांच्या जीवनावर प्रकाश टाकला बाबाच्या कार्याबद्दल माहिती सांगितली समाजाला संभोदीत करताना सांगितले की आपला समाज आज मोठ्या संख्येने एकत्र आलात असेच एकत्र राहिलात तर प्रगत व्हाल आणि असेच सुंदर व नियोजन बद्ध कार्यक्रम करत रहाल असा विश्वास व्यक्त केला .

आपल्या या समाजाच्या मंदिराच्या पायाभरणीत माझंही योगदान आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि आता अजून निधी या मंदिरासाठी उपलब्ध झालेला आहे.आणि त्यानुसार मंदिराच्या पुढील काम होणार आहे त्यासाठी आपला पूर्ण पाठिंबा राहील व लवकरच आपलं मंदिर सुसज्ज असा उभ राहील व त्यासाठी जी मदत लागेल ती आपण करू असे आश्वासन समाजास सन्मान्य नगराध्यक्ष यांनी दिले. समाजाच्या या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल खेड तालुका अध्यक्ष संतोषजी शिंदे व परीट समाज संस्था खेड यांच्या वतीने नगराध्यक्ष साहेब नगरसेवक व मनसे पदाधिकारी यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले .




