एम एम आर डी एमहाराष्ट्रमुंबईमुंबई चे रस्तेविधीविशेषसामाजिक

मेट्रो पिलरखालील मस्जिद : एमएमआरडीएच्या गलथान कारभारावर गंभीर प्रश्न

वारंवार होणारे बदल, फसलेले नियोजन आणि त्याची जबाबदारी कोण घेणार?अनिल गलगली यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मेट्रो पिलरखालील मस्जिद : एमएमआरडीएच्या गलथान कारभारावर गंभीर प्रश्न

मुंबई मेट्रोच्या डीएन नगर ते मंडाळे (मेट्रो 2B) प्रकल्पांतर्गत चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरात मेट्रो पिलरखाली मस्जिद असल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे नियोजन आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यापूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी MTHL (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक), SCLR (सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड) यांसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांतर्गत प्रार्थनास्थळांचे नियोजित व यशस्वी स्थानांतरण केलेले आहे. असे असताना, मेट्रो 2B प्रकल्पात पिलरखाली प्रार्थनास्थळ राहणे हे निष्काळजी नियोजनाचे द्योतक असल्याची टीका होत आहे.

मेट्रो 2B प्रकल्प आधीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. याआधी मार्गात बदल केल्यामुळे कुर्ला पश्चिम हलाव पुल परिसरातील गणेश विसर्जन मार्ग कायमस्वरूपी बंद झाल्याचा आरोप आहे. तसेच, काही प्रस्तावित स्थानके वगळण्यात आल्याचा आरोप RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

वारंवार होणारे बदल, फसलेले नियोजन आणि त्याची जबाबदारी कोण घेणार? असा थेट सवाल उपस्थित करत अनिल गलगली यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक सुरक्षितता, धार्मिक स्थळांबाबत संवेदनशीलता आणि प्रकल्पांची विश्वासार्हता या सर्व बाबींचे पालन न झाल्यास अशा पायाभूत प्रकल्पांवरील जनविश्वास डळमळीत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button