जागृत महाराष्ट्र चा 5 वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

जागृत महाराष्ट्र चा 5 वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला सोहळ्याचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते, जिथे अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून माननीय आमदार तथा माजी मंत्री असलम शेख, माननीय आमदार व माजी मुंबई महापौर सुनील प्रभू, माजी नगरसेवक मोसिन हैदर, माजी नगरसेवक संगीता संजय सुतार, भावना जैन, अंधेरी विभाग संघटक संजय मानाजी कदम, अवनिश सिंह, फरान आजमी, गुजराती समाज भवनचे संचालक नागजी रिटा, अपना घर संस्था अध्यक्ष सुरेश जलावडी, मयूर पटेल , मुंबई मच्छीमार काँग्रेस अध्यक्ष धनाजी कोळी, आकाश रणधीर, वरिष्ठ साउंड इंजिनिअर अनुज माथूर, आणि जितेंद्र कुमार पांडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २४ मान्यवरांना विविध श्रेणीतील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये डॉ. आम्रपाली मोहिते यांना ‘जागृत समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मा. रविंद बोटवे यांना ‘जागृत कृषी मित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. नागजी रीटा आणि राजेश दोशी यांना गुजराती समाज भवनच्या माध्यमातून ‘जागृत उत्कृष्ट सामाजिक संस्था’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इतर पुरस्कारांमध्ये सुरेश जलावडी आणि मयूर पटेल यांना ‘आपणा घर संस्था’च्या कार्यासाठी ‘जागृत समाज संस्था’ पुरस्कार, जितेंद्र पाण्डेय यांना ‘अनुभव फाउंडेशन’च्या कार्यासाठी ‘जागृत सामाजिक संस्था’ पुरस्कार, आणि नीलम गुप्ता यांना ‘जागृत महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लक्ष्मण डांगले यांना उद्योजक ,याशिवाय, आरोग्य सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणारे धनंजय पवार यांना ‘जागृत आरोग्य सेवा’ पुरस्कार देण्यात आला, तर नितीन शिंदे यांना ‘मधु तारा फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘जागृत समाज भूषण’ पुरस्कार मिळाला.

या सोहळ्यात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांना देखील पुरस्कार देण्यात आले. यामध्ये आबीद नकवी यांना ‘जागृत आदर्श पत्रकार’ पुरस्कार, आशा अशोक ब्राहाणे यांना ‘जागृत आदर्श शिक्षिका’ पुरस्कार, आणि पी.बी. कोकरे यांना ‘जागृत नागरिक’ पुरस्कार मिळाला. तसेच, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार सोहळा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या माध्यमातून प्रथमच आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना निस्वार्थ भावनेने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित २५ पुरस्कार मूर्तींनी आपले अनुभव आणि भावना व्यक्त करताना सांगितले की, असे व्यासपीठ खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी असते, कारण जे मान सन्मानाचे हक्कदार आहेत, त्यांना हे सन्मान मिळवून देण्याचे काम जागृत महाराष्ट्रने केले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी जागृत महाराष्ट्र मुख्य संपादक व संचालक अमोल शोभा गौतम भालेराव, संचालक सूरज शोभा गौतम भालेराव, कार्यकारी संपादक पंकज हेलोडे, ,गजानन बनसोड आणि विठ्ठल गडवे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत राहील आणि समाजातील इतरांना देखील प्रेरणा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.



