आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेष

अंधेरी पश्चिमेत मुसळधार पावसामुळे विशाल वृक्ष कोसळला; मनपाची तातडीची कारवाई

तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली

अंधेरी पश्चिमेत मुसळधार पावसामुळे विशाल वृक्ष कोसळला; मनपाची तातडीची कारवाई

 

मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील वार्ड क्रमांक ६५ अंतर्गत ब्लेस व्ही बिल्डिंग, म्हातारपाडा, आंबोली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी एक विशाल वृक्ष अचानक रस्त्यावर कोसळला. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाने तातडीने दखल घेत कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठवले. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वृक्षाचे तुकडे करून तो रस्त्यावरून हटवला. त्यानंतर रस्ता सुरक्षित करून वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

 

या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. मनपाच्या त्वरित प्रतिसादाचे नागरिकांनी कौतुक केले.

 

दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, झाडे, वीजवाहिन्या किंवा इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button