अंधेरी पश्चिमआमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

भाजपा नगरसेवक रुपेश सावरकर यांचा दणका! चित्रकूट ग्राउंडवरील वादग्रस्त जाहिरात फलकावर अखेर बुलडोझर; अग्निशामन केंद्रासाठी लढा आणखी तीव्र

चित्रकूट ग्राउंड येथे अग्निशामन केंद्र उभे राहत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही- रुपेश सावरकर (नगरसेवक वॉर्ड ६३)

रुपेश सावरकर यांचा दणका! चित्रकूट ग्राउंडवरील वादग्रस्त जाहिरात फलकावर अखेर बुलडोझर; अग्निशामन केंद्रासाठी लढा आणखी तीव्र

अंधेरी पश्चिम | प्रतिनिधी

अंधेरी पश्चिमेतील वॉर्ड क्रमांक ६३ मध्ये भाजपा नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर चित्रकूट ग्राउंडवरील वादग्रस्त जाहिरात फलक हटवण्याची मोठी कारवाई करण्यात आली. शाह कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जाहिरात फलकासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागाने क्रेनच्या सहाय्याने फलक निष्कासित करण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

चित्रकूट ग्राउंडवरील जागा ही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या ठिकाणी अग्निशामन केंद्र उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, त्या जागेवर उभारण्यात आलेल्या चित्रकरण स्टुडिओ, अवैध बांधकाम, जाहिरात फलक यांच्यामुळे अग्निशामन केंद्राच्या प्रस्तावावर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत होता. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक रुपेश सावरकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

 

या प्रकरणात संबंधित जाहिरात फलकाबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर के-पश्चिम विभागाने कोणताही विलंब न लावता प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई हाती घेतली. क्रेन आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्याने फलक हटवण्यात आला. या संपूर्ण कारवाईकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते.

कारवाईनंतर बोलताना नगरसेवक रुपेश सावरकर यांनी स्पष्ट इशारा दिला,

“चित्रकूट ग्राउंड येथे अग्निशामन केंद्र उभे राहत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हा केवळ जाहिरात फलक हटवण्याचा विषय नाही, तर नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न आहे. अंधेरी पश्चिममधील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या भागात अत्याधुनिक अग्निशामन केंद्र उभारणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी माझा लढा सुरूच राहील.”

सावरकर यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने अग्निशामन केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशीही त्यांनी मागणी केली.

स्थानिक नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत, चित्रकूट ग्राउंडवर लवकरात लवकर अग्निशामन केंद्र उभारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आता जाहिरात फलक हटवल्यानंतर या जागेवर अग्निशामन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा होणार का, याकडे अंधेरीकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button