पावसातही रस्त्यावर नगरसेवक दीपक कोतेकर; प्रभाग ६७ मध्ये नागरिकांच्या मदतीसाठी धाव, BMC ला तातडीच्या कारवाईचे आदेश
आम्ही जनतेचे सेवेकरी आम्ही 'AC मध्ये बसून नाही, मैदानात उतरुन काम करतो' - दीपक कोतेकर( नगरसेवक वॉर्ड ६८)

पावसातही रस्त्यावर नगरसेवक दीपक कोतेकर; प्रभाग ६७ मध्ये नागरिकांच्या मदतीसाठी धाव, BMC ला तातडीच्या कारवाईचे आदेश

(महाराष्ट्र News 9 टीम)| प्रतिनिधी – मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, गटारे तुंबणे आणि नागरिकांची गैरसोय होण्याच्या घटना घडत असताना, प्रभाग क्रमांक ६७ मधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी भाजपा नगरसेवक दीपक कोतेकर स्वतः रस्त्यावर उतरले. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुलमोहर रोड, शितलादेवी रोड, पुलकित इमारत परिसर, बर्फीवाला शाळा, गणेश नगर आणि इंडियन ऑईल नगर येथे BMC अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पाहणी करण्यात आली. या ठिकाणी पाणी साचण्याची कारणे, जलनिस्सारण व्यवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्यानंतर नगरसेवक दीपक कोतेकर यांनी राजेश केकाण, दशरथ पारदळे, राकेश सिंग आणि अन्वर खान यांच्यासह समता नगर, जुन्नत नगर आणि खजुरवाडी परिसरातील गल्लीबोळ, गटारे आणि पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि BMC प्रशासनाला त्वरित आवश्यक कामे करण्याच्या सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान खजुरवाडी येथील सार्वजनिक शौचालयाची टाकी पूर्ण भरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने सफाईसाठी मजूर उपलब्ध करून देण्याचे आणि संबंधित कंत्राटदाराला त्वरित काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
नगरसेवक दीपक कोतेकर यांनी सांगितले की, “पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित आणि दिलासादायक वातावरण मिळणे ही आपली जबाबदारी आहे. समस्या समोर आल्यानंतर केवळ बैठका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यावर उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी आम्ही प्रशासनासोबत सातत्याने काम करत राहू.”
या पाहणीनंतर स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. “AC मध्ये बसून नाही, तर रस्त्यावर उतरून काम करणारा नगरसेवक,” अशा शब्दांत नागरिकांनी दीपक कोतेकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
प्रभाग क्रमांक ६७ मध्ये पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयामुळे नागरिकांना तातडीने दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Slug: WARD 67 MONSOON INSPECTION
Tags: #DeepakKotekar #AmitSatam #Ward67 #AndheriWest #Monsoon #BMC #MumbaiRain #PublicService #MaharashtraNews9



