आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

साकीनाक्यात निघाली श्री जगन्नाथ रथयात्रा

श्री जगन्नाथ सेवा मंडळ यांची 34 वर्षाची परंपरा कायम

साकीनाक्यात निघाली श्री जगन्नाथ रथयात्रा

 

श्री जगन्नाथ मंदिर, साकीनाका अंतर्गत श्री जगन्नाथ सेवा मंडळ तर्फे सतत 34 वर्षे साकीनाका येथील सत्य नगर विभागात श्री जगन्नाथ रथयात्रा काढली गेली. प्रत्येक वर्षी 1 लाख भाविक मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण येथून दर्शनासाठी येतात. श्री जगन्नाथ रथयात्रा ही श्री जगन्नाथ मंदिर येथुन निघत श्री गुंडीचा ( मौसीमां) मंदिर येथे जाऊन समाप्त झाली.

 

श्री जगन्नाथ रथयात्रेत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, आमदार दिलीप लांडे, नगरसेवक आमिर नसीम खान, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, विनोद मुनि, सुरेंद्र सिंह, रणजीत मुनि, प्रमोद मुनि, उत्तम साहू, सुनील नायक, राधेश्याम पाणिग्रही, राम साहू, नीलांचल साहू उपस्थित होते. साकीनाका पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button