आमची मुंबईमहाराष्ट्रराजकीय बातमीसामाजिक
Trending

खोकेवाला आमदार की समाजकारणतून राजकारणामध्ये जाणारा नेता?

User Rating: 4.1 ( 1 votes)

खोकेवाला आमदार की समाजकारणतून राजकारणामध्ये जाणारा नेता?
बच्चूभाऊ तुझी प्रहार ची सेवा अशीच अखंड राहू दे..!!!
गेल्या काही महिन्यांपासून जशी सत्ता बदल झाल्यानंतर बच्चूभाऊ वर खोके वाला आमदार अशी चिखल फेक होत आहे आशा या चिखलफेक च्या राजकारणात आपल्या सामाजिक राजकारणाच्या व्यक्तिमत्वावर काही व्यक्ती प्रश्न चिन्ह निर्माण करत आहे खरंच बच्चूभाऊ खोके घेतले??की या व्यक्तीला जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना?? असा सवालही आता महाराष्ट्राच्या जनतेनेमध्ये होऊ लागला आहे.


गेल्या २५ते ३० वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामधली जनता बघत आहे की बच्चूभाऊ कडू यांनी समाजकारण असो की राजकारण त्यांचे कार्य हे शेतकरी ,अपंग, अनाथ ,समाजामधील वंचित घटक यांच्या हक्कांसाठी लढणार नेता म्हणून ओळख! त्यांच्या राजकारणाची सुरवात व पायाभरणी याचमुळे आहे.
आज आपण समाजामध्ये बघतोय की जर एखाद्या व्यक्तीने १०० चांगले काम केले असेल अन जर १ जर काम वाईट केल्याचा नुसता त्याच्यावर आरोप जरी केला तर त्याच्या १०० कामाची किंमत शून्याची कल्पना करून बसतोय.
बच्चूभाऊ हा रोखटोकपणे ,जी वस्तुस्थिती आहे त्या वर परखड पणे बोलणार नेता आहे मग तो सत्ते मध्ये असो की विरोधात अशी या व्यक्तीचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राने आजपर्यंत बघितला आहे.


सत्तेमधे असणारे असो की विरोधीपक्षामध्ये असणारे जेव्हा आपली कोणी बाजू ऐकणार नाही तेव्हा सामान्य व्यक्तीला वाटतेय की बच्चूभाऊ कडू आपली बाजू नक्की ऐकले व आपल्या न्याय मिळवून देईल असा विश्वास जनतेच्या मनात भाऊच्या विषयी निर्माण आहे
चांगले करणाऱ्या व्यक्तीवर आशा प्रकारे चिखल फेक करणे कितपत योग्य हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ठरवणं योग्य राहील बाकी कुठली अफवा आणि कुठलं सत्य हे जनतेला नक्कीच कळतेय. शेवटी मी एकच म्हणेल ये पब्लिक है ये सब जानती ये पब्लिक है।

  • *रेखाटन व शब्दरचना- *©इंजि. शुभम प्रकाशराव बांगडे* रा.चांदुर बाजार जिल्हा अमरावती मो.९९७५८०६४३४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button