शिक्षक भारतीचे कोकण शिक्षक मतदार संघातील उमेदवार धनाजी पाटील यांचा आज दापोली तालुक्यातील एक दिवसाचा संपर्क दौरा उत्साहात संपन्न
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जानेवारी 2023 महिन्यामध्ये संपन्न होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सध्या शिक्षक मतदार संघातील शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रमही प्रगती पथावर आहे.

शिक्षक भारतीचे कोकण शिक्षक मतदार संघातील उमेदवार धनाजी पाटील यांचा आज दापोली तालुक्यातील एक दिवसाचा संपर्क दौरा उत्साहात संपन्न
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जानेवारी 2023 महिन्यामध्ये संपन्न होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी सध्या शिक्षक मतदार संघातील शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रमही प्रगती पथावर आहे.
याचदरम्यान या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीने घोषित केलेले अधिकृत उमेदवार धनाजी पाटील यांनी आज दापोली ( रत्नागिरी ) तालुक्यातील अनेक शाळांशी प्रत्यक्ष संपर्क साधत शिक्षक संघटनेच्या बळकटीसाठी आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीच्या निमित्ताने संपर्क दौरा सुरू केला आहे.
आज या संपर्क दौऱ्यादरम्यान दापोली तालुक्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भेटी देण्यात आल्या. यावेळी शिक्षकांशी विविध समस्याबाबत व प्रलंबित प्रस्तावाबाबत सविस्तर विचार विनिमय करण्यात आला.

या दरम्यान शिक्षक नेते व उमेदवार धनाजी पाटील यांनी सध्याच्या स्थितीमध्ये शिक्षक संघटना बळकट बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांनी शिक्षक चळवळ बळकटीसाठी सक्रिय सहकार्य द्यावे. विधिमंडळामध्ये आपलं काम करणारा शिक्षकच, शिक्षक आमदार बनल्याशिवाय आपल्या प्रश्नांना पूर्णपणे न्याय मिळणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन केले. याला सभेला उपस्थित शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

या दौऱ्यादरम्यान आज नॅशनल हायस्कूल, हर्णे, एन डी गोळे हायस्कूल, हर्णे, नॅशनल हायस्कूल मांदिवली, न्यू इंग्लिश स्कूल मांदिवली, पी डी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय केळशी, आडे विद्यालय आडे, माध्यमिक विद्यालय,आंजर्ले, माध्यमिक विद्यालय पाज पंढरी, इ विद्यालयांना भेटी देऊन मुख्याध्यापक व शिक्षकांशी सुसंवाद साधण्यात आला.
यावेळी शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी संघटना बळकटीसाठी शिक्षकांनी एकजिनसीपणाने काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, तात्काळ शिक्षक भरती आणि शिक्षक संच मान्यतेतील जाचक अटी रद्द व्हाव्यात यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक चळवळ बळकट करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी इतर कोणत्याही आमिषाला शिक्षक बांधवांनी व भगिनींनी थारा देऊ नये असे नम्र आवाहन केले.


या संपर्क दौऱ्यादरम्यान शिक्षक भारतीच्या उर्दू विभागाचे राज्य सचिव मुबिन बामणे सर यांनीही अतिशय परखडपणाने आपली मते व्यक्त केली. शिक्षक चळवळ बळकट होण्यासाठी शिक्षक मतदार संघातून निवडून जाणारा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे. याला अनुसरूनच शिक्षक भारतीने तब्बल 35 वर्ष शिक्षक चळवळीमध्ये सक्रियपणे कार्य केलेल्या आणि अखंडपणाने शिक्षकांना व मुख्याध्यापकांना विविध प्रश्नाबाबत मार्गदर्शनाची भूमिका बजावलेल्या एका अभ्यासू कार्यकर्त्याला म्हणजेच श्री धनाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आपणा सर्वांनाच एक उत्तम प्रकारची संधी प्राप्त झालेली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
*यासाठी उमेदवार धनाजी पाटील यांच्या नावापुढे 1 हा पसंतीचा अंक लिहून पाठबळ देऊ या असे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले.*

त्यांच्या भूमिकेला शिक्षकानी उत्स्फूर्तपणे प्रसाद दिला.
आजच्या या दौऱ्या दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल शिक्षक भारतीच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
या संपर्क दौऱ्यात उमेदवार धनाजी पाटील यांच्याबरोबर शिक्षक भारतीच्या उर्दू विभागाचे राज्य सचिव मुबीन बामणे, दापोली तालुक्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक गुंजाळ सर,संघटक श्री जुबेर मुल्ला सर, सदस्य इब्राहिम कुमनाळी सर इ. सहभागी झाले होते.



