वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्षपदी प्रशांत राणे यांची नियुक्ती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः नियुक्तीपत्र देत प्रशांत राणे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली

वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्षपदी प्रशांत राणे यांची नियुक्ती

मुंबईतील वर्सोवा विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठा बदल करण्यात आला आहे. मनसेच्या वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्षपदी कार्यरत असलेल्या अध्यक्षा संदेश देसाई यांच्या जागी आता प्रशांत राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः नियुक्तीपत्र देत प्रशांत राणे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील मनसेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रशांत राणे हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने मनसेची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.
यावेळी पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशांत राणे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“राजसाहेबांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत वर्सोवा विधानसभा क्षेत्रात मनसेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार,” अशी प्रतिक्रिया प्रशांत राणे यांनी व्यक्त केली.
#MNS #RajThackeray #PrashantRane #Versova #MumbaiPolitics #BreakingNews #MaharashtraNews

