सर्वद फाऊंडेशनने पालघर जिल्ह्यात केले मेडिकल कॕम्पचे आयोजन

सर्वद फाऊंडेशनने पालघर जिल्ह्यात केले मेडिकल कॕम्पचे आयोजन
सर्वद फाऊंडेशन च्या पालघर जिल्हा शाखेतर्फे सालवड येथे दि. 24/11/2023 रोजी मेडिकल कॕम्पचे आयोजन करण्यात आले होते .प्रसिद्ध उद्योजक संदीप राऊत, प्रमोद संखे आणि सरपंच संजय पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. कॕम्पचा सालवड परिसरातील 120 लोकांनी लाभ घेतला. यासाठी मुंबईहून डाॕ. साईज्योत राऊत, डाॕ. प्रशंसा राऊत, डाॕ. निमिषा राऊत यांनी सहभाग घेतला. परिसरातील लोकांना आरोग्य विषयक वैयक्तिक मार्गदर्शन करण्याच्या हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पालघर जिल्हाध्यक्ष निता निलेश राऊत यांनी सांगितले . पुढील महिन्यातही असे शिबिर घेण्यात येणार असल्याचे सचिव अमित हिरे यांनी सांगितले . या कार्यक्रमासाठी संचालक डॉ. सुचिता पाटील, ओंकार देशमुख उपस्थित होते.



