Uncategorized

मुंबई भाजपा अध्यक्ष व अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमीत साटम यांच्या स्वप्नपूर्तीला प्रत्यक्ष सुरुवात

मुंबईतील सर्वात मोठ्या आणि पहिल्या समूह पुनर्विकास योजनेला अंधेरी पश्चिममधून सुरुवात मुंबईकरांसाठी ऐतिहासक क्षण

मुंबई, प्रतिनिधी : अंधेरी पश्चिममधील जुहू गल्ली समूह पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या महत्त्वाकांक्षी योजनेच्या निविदा प्रक्रियेला यश आले आहे. या प्रकल्पामुळे तब्बल २८ हजारांहून अधिक कुटुंबांना आधुनिक व सुरक्षित घरे मिळणार असून, मुंबईतील सर्वात मोठ्या आणि पहिल्या समूह पुनर्विकास योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी अंधेरी पश्चिममधून सुरू होत आहे.

या प्रकल्पासाठी रिलायन्स फॉर आर रिअल्टी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि महादेव रिअल्टर्स यांच्या कन्सोर्टियमची निवड करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) माध्यमातून राबविण्यात येणारा हा प्रकल्प मुंबईतील पुनर्विकास क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

 

या ऐतिहासिक निर्णयामुळे अंधेरी पश्चिमचे आमदार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी पाहिलेल्या विकासाच्या स्वप्नाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळाल्याने परिसरातील हजारो कुटुंबांच्या नव्या आयुष्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांना सुरक्षित, सन्मानजनक आणि आधुनिक निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधांमध्येही मोठी सुधारणा होणार आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिमच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील समूह पुनर्विकास प्रकल्पांसाठी हा प्रकल्प आदर्श ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

महत्त्वाचे मुद्दे

 

✅ जुहू गल्ली समूह पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण

✅ २८ हजारांहून अधिक कुटुंबांना लाभ

✅ मुंबईतील सर्वात मोठा समूह पुनर्विकास प्रकल्प

✅ अंधेरी पश्चिमच्या विकासाला नवी गती

✅ आधुनिक घरे आणि सुधारित नागरी सुविधा उपलब्ध होणार

✅ भविष्यातील पुनर्विकास प्रकल्पांसाठी आदर्श नमुना

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button