अंधेरी पश्चिम येथे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश – अंधेरी पश्चिम जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

अंधेरी पश्चिम येथे *टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य* मुंबई प्रदेश – अंधेरी पश्चिम जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या शुभहस्ते पार पडले उद्घाटन

मुंबई – दिनांक 14.08.24 रोजी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.श्री. संजय भाऊ खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.तानाजी भाऊ जाधव यांच्या शुभहस्ते इंदिरा नगर , अंधेरी पश्चिम येथे *टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य* मुंबई प्रदेश – अंधेरी पश्चिम जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संघटना आहे. गोर गरीब दीन दुबळ्या लोकांचे काम गेले 15 वर्ष महाराष्ट्र व देशातील इतर सर्व राज्यात करत आहे. ह्या ग्रुप चे सर्वेसर्वा मा.श्री.तानाजी भाऊ जाधव यांचे लोकसेवेचे कार्य पूर्ण देशात प्रसिद्ध आहे आणि ह्याचे कार्यालय करमाळा , सोलापूर येथे आहे.
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश – अंधेरी पश्चिम चे संपर्कप्रमुख ऍड.गणेश परमेश्वर कांबळे यांनी हा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. हे अंधेरीचा वरदविनाक गणपती मंडळाचे सचिव , साई गणेश पदयात्री मंडळाचे खजिनदार व श्रीनाथ जनकल्याण प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष देखील आहेत.

सदर सोहळ्यात शिवभक्त अनिकेत भाऊ घुले , मराठवाडा अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर , समाजसेविका छायाताई खंडागळे, उद्योजक हर्षला योगेश तांबोळी , टायगर ग्रुप मुंबई प्रदेश वर्सोवा प्रभारी आकाश व्हणकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्रीनाथ जनकल्याण प्रतिष्ठान अधक्ष्या सुरेखा परमेश्वर कांबळे ह्यांसकडून सोहळ्या निमित्त परिसरातील गरजू महिलांना मोफत धान्य कीट देण्यात आले.
महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून टायगर ग्रुप चे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते ह्या सोहळ्यात उपस्थित होते.




