आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईशैक्षणिक

वर्सोवा पोलिस स्टेशन हद्दीत शाळकरी मुलींना मारहाण प्रकरणात मुंबई पोलिसांनी ट्विट करून कारवाई केली असुन गस्त वाढवली असल्याचे ट्विट करून सांगितले

अंधेरी पश्चिम यारी रोड येथील शाळकरी मुलींना मारहाण केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता . मारहाण झालेल्या शाळकरी मुलींना कपड्यांवरून बोलणे, मित्र मैत्रिणींच्या ग्रुपबद्दल बोलणे, या कारणावरून मुलींमध्ये वाद झाला होता. या वादामुळे १० ऑगस्ट रोजी वर्सोवा पोलिस स्टेशन हद्दीत एका १४ वर्षीय विद्यार्थिनीला तिधी-चौधींनी मारहाण केली होती या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल झाला होता.

या वायरल व्हिडिओची महिती वर्सोवा पोलिसांना मिळताच वर्सोवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गद्शनाखाली निर्भया पथकाने संबधीत व्हिडिओ मधील मुलींची ओळख पटवली.

बालकल्याण समितीचे सुनिल शिरसागर यांनी मारहाण करणाऱ्या मुली देखिल अल्पवयीन व शाळकरी असल्यामुळे अदखलपात्र गुन्हा नोंद न करता त्यांचे समुपदेशन करण्यास सांगीतले. तसेच मारहाण झालेल्या मुलींच्या पालकांनी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगत मारहाण करणाऱ्या मुलींना समज देण्यास सांगितले .

सदर घटनेची गंभीर दखल घेऊन संबधीत शाळा प्रशासन यांनी देखिल घडलेल्या प्रकाराबाबत खुलासा केला आहे

यावेळी वर्सोवा पोलिसांनी स्नेहा फाउंडेशनच्या रेवा प्रिया याना संपर्क करून त्यानी मुलींचे व त्यांच्या पालकांचे निर्भया कक्ष येथे समुपदेशन केले. शाळकरी मुलींना मारहाण झालेल्या व्हिडिओची तत्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई केल्या बद्दल वर्सोवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांचे कौतुक होत आहे .

या घटनेचा व्हिडियो अजूनही मोठ्या प्रमाणात वायरल होत असल्याची मुंबई पोलिसांनी दखल घेउन त्यांच्या अधिकृत एक्स ( आधीचे ट्विटर हँडेल) वरून ट्विट करत या घटनेवर मुम्बई पोलिसांचे निर्भया पथक लक्ष ठेवून असुन या भागात गस्त वाढविली असल्याचे सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button