आमदार अमित साटम यांनी प्रदिप हिंगड यांच्या सहायम सामाजिक संस्थेच्या वेबसाईटचे केले उद्घाटन
अंधेरीचा राजा विसर्जन सोहळा सूरू असताना हजारो गणेश भक्त उपस्थीत असताना वेबसाईटचे उद्घाटन संपन्न

अंधेरीचा राजा विसर्जन सोहळा सूरू असताना हजारो गणेश भक्त उपस्थीत असताना वेबसाईटचे उद्घाटन संपन्न
मुंबई – संकष्ट चतुर्थी निम्मित अंधेरी पश्चिम मधील आझाद नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांच्या अंधेरीचा राजा गणपती बाप्पा विसर्जनाला निघतो आणि यावेळी हजोरो अंधेरीकर रस्त्यावर उतरून अंधेरीच्या राजला निरोप देत असतात.

याच अंधेरीचा राजा विसर्जन मिरवणूक सोहळ्या वेळी अंधेरी पश्चिम विधानसभा मध्ये मागील तीन वर्षांपासून जनसेवेचे सेवाभावी काम करणारे जनसेवक प्रदिप हिंगड यांच्या सहायम सामाजिक संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमित साटम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमित साटम यांनी सहायम सामाजिक संस्था करत असलेल्या कामाच कौतुक करतील अंधेरी पश्चिम विधानसभा मधील सहायम सामजिक संस्था नावा प्रमाणेच काम करत असून भविष्यात अजून चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी संस्थेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तर सहायम चे अध्यक्ष जनसेवक प्रदिप हिंगड यांनी सांगितले की आमदार अमित साटम दमदार आणि धमाकेदार आमदार आहेत आणि ज्या पद्धतीने आमची संस्था अंधेरीकर यांची सेवा करून सहाय्य करण्याचें काम करते तसेच काम मागील दहा वर्षा पासुन आमदार अमित साटम करत आहेत म्हणून माझी ईच्छा होती की आमच्या सामाजिक संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन आमदार अमित साटम यांच्याच हस्ते झाले पाहिजे आणि ते आमदार अमित साटम यांनी केले त्यासाठी मी त्यांच्या आभारी आहे




