आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबई

मालाड: सार्वजनिक व घरगुती गणपती सजावट स्पर्धा कार्यक्रम एकात्मतेचा संदेश देणारा ठरला

मालाड: सार्वजनिक व घरगुती गणपती सजावट स्पर्धा कार्यक्रम एकात्मतेचा संदेश देणारा ठरला

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार मा. श्री. अस्लम शेख मित्र मंडळ 162* यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक व घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2024 ला मोठा प्रतिसाद मिळाला. मलाडचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात विविध गणपती मंडळांनी उत्कृष्ट सजावट सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन कपोल हॉल, काचपाडा येथे करण्यात आले होते, आणि यावेळी हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.

स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक 50 हजार रुपये, तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक 25 हजार रुपये देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात केवळ गणेशोत्सवाच्या सुंदरतेचे दर्शन घडले नाही, तर एकात्मतेचा आणि सर्वधर्म समभावाचा संदेशही दिला गेला.

विशेष म्हणजे या प्रसंगी बॉलिवूड आणि मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून अस्लम शेख यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. आपल्या भाषणात त्यांनी शेख यांचे सामाजिक आणि धार्मिक एकतेसाठी दिलेले योगदान अधोरेखित केले. गेल्या 20 वर्षांपासून मालाडच्या नागरिकांच्या कल्याणासाठी, तसेच विविध धर्मांतील सौहार्द टिकवण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

विज्ञानावर आधारीत देखावा , लाय फाय तंत्रज्ञानाचा भविष्यात तंत्रज्ञानामध्ये होणारी संभाव्य प्रगती व त्याचा विद्यार्थ्यांना होणारा उपयोग या बदल देखावा करणारे अनिल राऊत घरगुती गणपतीस प्रथम पारितोषिक देण्यात आले त्याच बरोबर शिर्डीचे साई,द्वारकामाई यांचा देखावा सादर केल्या बदल संजय पवार यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले.तृतीय पारितोषिक चे मानकरी शिल्पा संगारे ज्यांनी बांबू पासून गणपतीचा देखावा केला होता.

तसेच या प्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता यात
सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धेचा निकाल

आमदार अस्लम शेख मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा 2024 मध्ये तीन मंडळांनी त्यांच्या सर्जनशील आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांसाठी पारितोषिके जिंकली.

प्रथम पुरस्कार:
श्रीगणेश मित्र मंडळ, राईपाडा (प्रभाग क्र. 46)
संकल्पना: कचरामुक्त भारत
मंडळाने कचऱ्याच्या दुष्परिणामांवर भाष्य करत कचरामुक्त भारताचा संदेश दिला. प्लास्टिक कचऱ्यामुळे प्राण्यांना होणाऱ्या त्रासावरही लक्ष वेधले. त्यांचा देखावा परीक्षकांच्या मनाला भावला, ज्यामध्ये कागदी लगद्यापासून बनवलेली श्रीगणरायाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण होती.

  1. द्वितीय पुरस्कार:
    युवक उत्कर्ष मंडळ, बी.एम.सी कॉलनी (प्रभाग क्र. 33)
    संकल्पना: भारतीय सैन्य दल
    मंडळाने “रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा” या संकल्पनेवर आधारित भारतीय जवानांच्या बलिदानाचे प्रतीक असलेला देखावा सादर केला. त्यासोबतच कपडा बँकेच्या माध्यमातून अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांसाठी कपडे संकलन केले. निर्माल्यापासून खत निर्मितीची संकल्पना सादर केली, ज्यामुळे परीक्षक प्रभावित झाले.

3.तृतीय पुरस्कार:
रामेश्वर मित्र मंडळ, रामनगर
संकल्पना: महिलांच्या समस्या
मंडळाने महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या यासारख्या समस्यांवर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रबोधनपर एलईडी व्हिडिओने परीक्षकांचे लक्ष वेधले, ज्यामुळे त्यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.

या सर्व मंडळांना त्यांच्या सामाजिक आणि सर्जनशील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

गणपती मंडळांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अस्लम शेख हे केवळ राजकारणात नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. “ते सर्व धर्मांना एकत्र आणून चालत असून, प्रत्येक धर्माच्या सण-उत्सवांना महत्त्व देतात. आम्ही त्यांचे आभारी आहोत, आणि चौथ्यांदा त्यांना आमदार म्हणून पाहण्यासाठी उत्सुक आहोत,” असे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि एकतेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button