आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईवर्सोवा विधानसभाशैक्षणिकसामाजिक

संतोष यादव यांचे सामाजिक उपक्रमातून आई स्वर्गीय गीता यादव यांना अभिवादन

मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना केले नोटबुक वाटप

मुंबई- संतोष यादव यांचे सामाजिक उपक्रमातून आई स्वर्गीय गीता यादव यांना अभिवादन करण्यात आले.  युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना केले नोटबुक वाटप करून वर्सोवा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष यादव यांनी त्यांच्या आई स्वर्गीय गीता यादव यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत स्थानिक विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वाटप करण्यात आले.

शिक्षण हेच खरे दान मानून संतोष यादव यांनी आपल्या आईच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेतला. यावेळी परिसरातील अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हातात नवीन वह्या देताना त्यांचे डोळे आनंदाने चमकले.

यावेळी मुंबई युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले सामाजिक कार्य करून स्वर्गीय गीता यादव यांची कमी भरून काढण्याचे काम संतोष यादव करत असून येणार्‍या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत नक्की त्यांच्या व त्यांच्यासारख्या युवा कार्यकर्ते यांचा नक्की विचार केला जाईल असे सांगितले

या कार्याबद्दल स्थानिक नागरिकांनी संतोष यादव यांचे मनःपूर्वक कौतुक केले. समाजातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button