अंधेरी पश्चिमआमची मुंबईके पश्चिम विभागगुन्हेमहाराष्ट्रमुंबईमुंबई चे रस्तेवर्सोवा विधानसभाविशेषसामाजिक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरसेवक रुपेश सावरकर यांनी घेतली भेट

वॉर्ड क्रमांक 63 मधील आरक्षित जागेवर अग्निशमन केंद्र मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आयुक्ताच्या भेटी नंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई – मुंबई महानगर पालिका वॉर्ड क्रमांक ६३ चे नगरसेवक रुपेश सावरकर यांनी प्रभाग क्रमांक ६३ च्या सर्वांगीण विकासासाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत वर्सोवा मतदारसंघाच्या तातडीच्या पायाभूत सुविधांच्या गरजांसाठी चर्चा केली. ज्यात अग्निशमन सेवेसाठी साहेबांना निवेदन सादर केले.

वॉर्ड क्रमांक 63 मधील आरक्षित जागेवर अग्निशमन केंद्र मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे पाहायला मिळत आहे. रूपेश सावरकर यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्ताच्या भेटी नंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

 

प्रभागात सुसज्ज अग्निशमन केंद्र नसल्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल पोहचण्यास विलंब होतो. तसेच येथे निवासी इमारती आणि झोपडी वस्त्या असल्यामुळे नागरिकांचे जीवन आणि मालमत्तेवर धोका निर्माण होतो. नवीन केंद्रामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद मिळेल, यासोबतच, टँक प्लॉटच्या पुनरुज्जीवनासह इतर महत्त्वपूर्ण विकासकामांवरही सकारात्मक चर्चा झाली. प्रभाग क्रमांक ६३ मधील प्रत्येक भागाला आधुनिक आणि नीटनेटके पायाभूत सुविधा असलेले आदर्श ठिकाण बनवणे हेच माझे उद्दिष्ट आहे.

यावेळी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या सर्व मागण्या लवकरात लवकर प्रक्रियेत आणण्याचे आश्वासन दिले. “Better & Fast Development” या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आवश्यक प्रकल्पांना प्रत्यक्षात आणण्यासाठी गती मिळाली आहे. तसेच भेटीदरम्यान पक्षसेवेसाठी साहेबांचे मार्गदर्शन घेतले आणि आशीर्वादही मिळाले.

वर्सोवा प्रत्येक नागरिकासाठी अधिक सुरक्षित आणि सुविधा संपन्न ठिकाण बनवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत असताना, मुख्यमंत्री महोदयांच्या दूरदर्शी दृष्टिकोन आणि पाठिंब्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button