आमची मुंबईके पश्चिम विभागमुंबईमुंबई चे रस्तेवर्सोवा विधानसभाविशेषसामाजिक

*वर्सोवा तसेच अंधेरी पश्चिम येथील विकासकामांचा खासदार रविंद्र वायकर यांनी घेतला आढावा व केली पाहणी*

क्रांतीनगर बेहराम बाग येथे खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते संपन्न.

*वर्सोवा तसेच अंधेरी पश्चिम येथील विकासकामांचा खासदार रविंद्र वायकर यांनी घेतला आढावा व केली पाहणी*

– वर्सोवा मांडवी जेट्टी एसटीपी प्लांट

– ⁠यारी रोड ते एसव्हीपी नगर ब्रिज

– ⁠वर्सोवा ते मढ ब्रिज

– ⁠⁠अंधेरी सबवे येथे बांधावयाचा ब्रिज

– ⁠ओशिविरा येथे सुरू असलेल्या ब्रिजच्या उभारणीचे काम

 

*मुंबई:*

 

वर्सोवा खाडीत थेट सोडण्यात येणाऱ्या मल:जल प्रकल्पामुळे या खाडीत वाढत जाणारे प्रदूषण व माशांची कमी होत असलेली उत्पत्ती कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्लांटचा आढावा २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी घेतला तर वर्सोवा व अंधेरी पश्चिम या क्षेत्रात मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या व सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची वायकर यांनी पाहणी केली.

या आढावा बैठकीला तसेच पाहणी दौऱ्यावेळी के – पश्चिम मनपा कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चक्रपणी अल्ले, सहाय्यक अभियंता पूल वर्षा शिंदे, सहाय्यक अभियंता परिक्षण निलेश मेस्त्री, सहाय्यक अभियंता राजेश पाटील, कृष्णा पाटील, अनिल कालबंदे, तुषार पाटील, हर्षद खैरमोडे, विजय बदाडे, सुनील भांगरे, अमेय उन्होने, फिशरी विभागाचे राजहंस तापके, वर्सोवा कोळी समाजाचे सचिव महेंद्र फोके, खजिनदार उत्कर्ष हिरे, सल्लागार पंकज सिंग, संदेश परुळकर, दत्तात्रय किणी, आशुतोष लोटे, मनपाच्या विविध विभागाचे अन्य अधिकारी विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, राजू पेडणेकर, राजुल पटेल, प्रतिमा खोपडे, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी तसेच स्थानिक जनता उपस्थित होती.

वर्सोवा खाडीत सोडण्यात येणाऱ्या मल:जलमुळे खाडीतील वाढते प्रदूषण दूर करण्यासाठी सीवरेजट्रीटमेंट प्लांट (एस टी पी) मनपा तर्फे उभारण्यात येत आहे. हा प्लांट कुठे उभारण्यात येत आहे, याची ड्रेनेज लाईन या प्लांटला कशा प्रकारे जोडण्यात येत आहे, ट्रीटमेंट नंतर वर्सोवा खाडीत पाणी पुढे कुठे व कसे सोडण्यात येणार आहे, यासाठी वर्सोवा गावात पाईप लाइन कशी टाकण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती मनपाचे अधिकारी यांनी खासदार वायकर यांना दिली. २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली. वायकर यांनी मनपाचे अधिकारी यांना या कामाबाबत काही सूचनाही केल्या. यावेळी वर्सोवा येथील कोळी समाज तसेच येथील पदाधिकारी उपस्थित होते.

वर्सोवा खाडीत मल:जल ज्या ठिकाणी सोडण्यात येत आहे त्याची पाहणीही खासदार वायकर यांनी केली. पावसाळ्यात दरवर्षी अंधेरी सबवे येथे साठणाऱ्या पाण्यामुळे वाहनचालक तसेच रहिवाशी यांची होणारी गैरसोय यातून सुटका करण्याबरोबरच कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ब्रिजसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येत असल्याची माहिती खासदार वायकर यांनी उपस्थितांना दिली.

मनपा तर्फे प्रस्तावित वर्सोवा ते मढ ब्रिजची संपूर्ण माहिती व सद्यस्थिती यांचाही आढावा घेण्यात आला व पाहणी यावेळी करण्यात आली. अंधेरीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यारी रोड ते एसव्हीपी नगर येथे उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाची माहिती घेऊन तसेच पाहणी केल्या नंतर ओशिवारा नाल्याजवळ मनपा तर्फे धीम्यागतीने सुरू असलेल्या ब्रिजच्या कामाची पाहणी त्यांनी केली.

 

डिसेंबरपर्यंत हा ब्रिज पूर्णतः वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी खासदार यांना दिली. यानंतर अंधेरी पश्चिम येथील शाखा क्रमांक ६२ क्रांतीनगर बेहराम बाग येथे खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन खासदार यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button