Uncategorized

मुंबईच्या प्रभाग रचनेवर आयोगाचे शिक्कामोर्तब केले

मुंबई: मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रभाग रचनेवर आयोगाचे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकी कामाला गती येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या २३६ सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबईतील वाढीव सदस्यसंख्या तसंच प्रभाग रचना निश्चितीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे ज्यावर भाजप ने आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या अंतिम प्रभाग क्रमांक १ पासून ते प्रभाग क्रमांक २३६ पर्यंतच्या प्रभाग रचना जाहीर केल्या आहेत ज्या आधी प्रभाग क्रमांक १ पासून ते प्रभाग क्रमांक २३६ करण्यात आले आहे. त्यामुळे, कोणता प्रभाग कोठून कुठपर्यंत असणार हे आता मुंबईकरांना माहिती होइल. त्यानुसार निवडणुकीच्या कामाला गती येणार असून शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे सोबत आम आदमी पक्ष तसेच विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार ठरवतील व अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक लढवणारे राजकिय व सामाजिक कार्यकर्ते तयारीला लागतील.

आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. शहरातील ३२ प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला. ओबीसी राजकीय आरक्षणा शिवाय निवडणुका घ्याव्यात आणि दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याआधी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करुन त्यावरील हरकती सूचनांची कार्यवाही १० मार्च रोजी पूर्ण केली होती. त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचे सादरीकरण आयुक्तांनी गेल्या मंगळवारी केले होते. त्याला निवडणूक आयोगानेअखेर मान्यता दिली. त्यानुसार अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे.

तुम्हाला जर तुमचा प्रभाग मध्ये कोणता कोणता विभाग आहे हे पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

https://t.co/qMQrtyjTXb

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button